Interview मध्ये वारंवार रिजेक्ट होताय, तर या गोष्टी करा आणि मिळवा यश

Interview Tips In Marathi
Interview Tips In Marathi

नोकरीसाठी तुम्ही गेल्या वेळी दिलेल्या मुलाखतीत अपयशी ठरला होता का? तर निराश होण्याची गरज नाही. तुम्हाला नोकरी मिळणार असेही नाही. आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच सांगणार आहोत...

साधारण दोन दशकांपूर्वी जेव्हा जे.के.रोलिंग हॅरी पाॅटर मालिकेतील पहिले पुस्तक प्रकाशित करण्यासाठी धडपड कर होत्या. तेव्हा त्यांना जवळजवळ सर्व प्रकाशन गृहांनी नकार दिला होता. एकल आई असूनही त्यांनी हार मानली नव्हती. रोलिंग या दरोदारी फिरत राहिल्या. अखेर त्यांना यश मिळाले. ब्लुम्सबरीने त्यांचे पुस्तक छापण्याचा निर्णय घेतले. आज रोलिंग इंग्लंडमधील सर्वाधिक खपांच्या पुस्तकांची लेखिकांपैकी एक आहे. त्यांच्या पुस्तकांनी त्यांना जवळजवळ 25 बिलियनपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. द हॅरी पाॅटरची मालिकी हक्क सर्वांत चर्चित आहे. ज्यात व्हिडिओ गेम्स, चित्रपटे, मर्चंडाईज आणि अँम्युजमेंट पार्क्ससारख्या गोष्टींचा समावेश आहे. रोलिंग या अपयश ही यशाची पहिली शिडी आहे. या म्हणीमध्ये त्या अचूक बसतात. एकामागे एक मुलाखतीत अपयशानंतर पुढील मुलाखतीसाठी उत्साहाने पुढे जाण्यासाठी आम्ही तुम्हाला असे काही गोष्टी सांगणार आहोत जिथे तुम्हाला आशेचे किरण दिसेल. तुम्ही या छोट्या मोठ्या बदलांच्या मदतीने अपयशाला यशात बदलू शकता.

स्वतःच्या अपयशाचे विश्लेषण करा
ही सर्वांत मोठी कृती असेल. तुम्ही सर्व संभाव्य प्रश्न स्वतः विचारा ज्यामुळे तुम्ही मुलाखतीत अपयशी ठरला. तुम्ही वास्तवापेक्षा अधिक अपेक्षा ठेवल्या होत्या का? तुम्ही पगार जास्त मागितला होता का? तुम्ही गर्विष्ठ दिसत होता का? मुलाखतकर्ते पक्षपात करत होते का? एकदा पाठीमागे जाऊन तुम्ही या प्रश्नांचे प्रामाणिकपणे उत्तर द्यायला हवे. यामुळे तुम्हाला वेगळी दृष्टी मिळू शकते. मानसोपचार तज्ज्ञ मंजुळा एमके म्हणतात, की नोकरी मिळविण्यासाठी जे हवे ते सर्व तुमच्यात आहे, नोकरी न मिळण्यामागे सर्वांत मोठे कारण आहे उमेदवाराने गृहपाठ न करणे आणि त्यामुळे मुलाखतकर्त्याच्या कसोटीवर उतरु शकत नाही. जर शक्य होत असेल तर अशा लोकांशी बोला जे संबंधित कंपनी, संस्थेत काम करतात किंवा ज्यांनी काम केले आहे. जर तुमची निवड झाली नसेल तर तुम्ही कुठे चुकला हे जाणून घेण्यासाठी त्यांची मदत होऊ शकते. तुम्हाला समाधानी करण्यासाठी मुलाखत नसते. केवळ तुम्हाला काय मिळणार यावरच लक्ष केंद्रीत करु नका. कंपनीला हे जाणून घ्यायचे आहे की तुम्ही तिला काय देऊ शकता हे ध्यानात असू द्या.

रणनीती तयार करा
एकदा तुम्हाला कळाले की तुमची काय चुक आहे, त्यानंतर पश्चाप करु नका. त्याऐवजी भविष्यातील मुलाखतीसाठी रणनीती तयार करा. कोणत्या गोष्टी करु नये यावर विशेष लक्ष द्यावे. आदरातिथ्य उद्योगात मॅनेजर या पदावर असलेल्या हरिनी कृष्णास्वामी या एका आंतरराष्ट्रीय हाॅटेल चेन्समध्ये नोकरी मिळण्यापूर्वी एका विमान कंपनीने त्यांना नोकरी नाकारली होती. मला एक स्टँडर्ड रिजेक्शन लेटर मिळाले होते. जे की माझ्यासाठी फार मोठा झटका होता. कारण मी स्वतःला नेहमी सामर्थ्यवान, सुयोग्य आणि ज्ञानी समजत आले होते. परंतु मी अनुभवले होते की प्रवास करणे आणि उड्डाण करते वेळी आवश्यक काळजीवरुन मी काकू करत होते. याचे कारण असे नाही की मला ते करायचे होते. मी ज्या प्रकारे त्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिले होते, ते दूरदृष्टीच्या मापकात चुकीचे होते. मी आणखी चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायला हवे होते.

बॅकअप तयार ठेवा
डोक्यात कधीही असे आणू नका की तुम्ही पहिल्या मुलाखतीत यशस्वी व्हाल. मग तुमचे रिझ्युमे आणि परिचय पत्र कितीही उत्कृष्ट असो. वाॅल्ट डिस्नेला 1919 वर्षांत केन्सस सिटी स्टार या वर्तमानपत्रातून ना केवळ नाकारले होते, तर त्यांना हाकलूनही दिले होते. कारण संपादकांचे म्हणणे होते, की डिस्नेजवळ कल्पनांची कमतरता होती आणि त्यांच्याजवळ चांगले आडियाज नव्हते. आपण सर्व जाणता की यानंतर वाॅल्ट डिस्नेने काय केले. त्यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरु केली आणि सर्वांत चर्चित अॅनिमेटेड चित्रपटे बनवले आणि जगाचे हिरो बनले.

व्यावसायिक मदत घ्या
जर तुम्ही वारंवार मुलाखतीत अपयशी ठरत आहात. तर वेळ आली आहे, की तुम्ही तज्ज्ञांशी बोलले पाहिजे. करिअर कौन्सिलरशी भेटा आणि तुम्ही कुठे चुकत आहात हे जाणून घ्या. मुंजळा एमके म्हणतात, की करिअर कौन्सिलर नोकरीच्या मुलाखतीत तुमचे ध्येय मिळवण्यात मार्गदर्शक ठरु शकतात. कोणत्या प्रकारच्या विषयांपासून वाचले पाहिजे आणि पगाराच्या संबंधी कसे बोलल पाहिजे. करिअर कौन्सिलरशी यासाठीही बोलले पाहिजे की तुमचे कौशल्य, शैक्षणिक क्षमता, जुने अनुभव आणि पात्रतेच्या आधारावर तुम्ही योग्य दिशेने जात आहात किंवा तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रात शक्यता शोधण्यास साहाय्यभूत ठरते. तज्ज्ञांशी भेटून तुम्ही तुमचे शारीरिक हावभावात सुधारणा करण्यासाठी मदत करते.

सकारात्मक राहा
मुलाखतीत अपयश आले म्हणजे जग संपले असे होत नाही. चित्रपटात मोठे यश मिळविणारे अमिताभ बच्चनही आॅल इंडिया रेडिओने उद्घोषक पदासाठी नाकारले होते. त्यांचा आवाज चांगला नव्हता. आज पाच दशकानंतर अनेक लोकप्रिय चित्रपट करणारे आणि भारदस्त आवाजासाठी बच्चन यांना ओळखले जाते. आपल्या मजबूत गोष्टींकडे लक्ष द्या. एखाद्या कंपनी किंवा संस्थेने नाकारले म्हणजे तुमच्यात कोणतीच योग्यता नाही असे होत नाही. चाकोरीपद्धतीने विचार करणे सोडून द्या आणि आपल्या मजबूत गोष्टींचा फायदा उचला.     

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com