बारावीनंतर पुढे काय?'या' संधी तुमची वाट पाहतेय!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

दहावी-बारावीचा निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांपुढे आता आव्हान आहे ते योग्य व्यवसाय वा शिक्षण क्षेत्र निवडून आयुष्यात यशस्वी होण्याचे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना बारावी कला शाखेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना बारावीनंतर अनेक संधी उपलब्ध असतात. तरीही ‘बारावीनंतर पुढे काय?’ हा प्रश्‍न पडतो. योग्य मार्गदर्शन व दिशादर्शन झाल्यास हे विद्यार्थी आयुष्यात येणार्‍या आव्हानांचे शिवधनुष्य लीलया पेलू शकतात.

मे-जून महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांची उत्कंठा शिगेला पोचते. सुटीचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर निकालाची चाहूल लागते. किती गुण मिळणार हे कोडे निकाल लागल्यावरच सुटणार, हे माहिती असूनही मनामध्ये चलबिचल सुरू होते. दहावी-बारावीचा निकाल फारच महत्त्वाचा असतो. या निकालावरच विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे पुढचे गणित मांडले जाते. त्यातही कोणत्या संधी पुढे आहेत, हे जाणून घेऊयात

- राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत आमदारांनी काय सल्ला दिला? वाचा सविस्तर

दहावी-बारावीचा निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांपुढे आता आव्हान आहे ते योग्य व्यवसाय वा शिक्षण क्षेत्र निवडून आयुष्यात यशस्वी होण्याचे. दहावीनंतर विद्यार्थ्यांना बारावी कला शाखेत प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना बारावीनंतर अनेक संधी उपलब्ध असतात. तरीही ‘बारावीनंतर पुढे काय?’ हा प्रश्‍न पडतो. योग्य मार्गदर्शन व दिशादर्शन झाल्यास हे विद्यार्थी आयुष्यात येणार्‍या आव्हानांचे शिवधनुष्य लीलया पेलू शकतात. बहुतांश विद्यार्थ्यांना कला शाखेतून बारावी झाल्यानंतर पुढील आयुष्यात शिक्षणक्षेत्रातील कुठली पाऊलवाट आपली? हे शोधणे अवघड वाटते. याला कारण एकच. ते म्हणजे, संधींबद्दलचे अज्ञान. बारावी कला शाखेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधींचा परिचय व्हावा या हेतूने हा लेखप्रपंच.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बारावी कला शाखेच्या विद्यार्थ्यांना विमानसेवा (एव्हिएशन) आणि अ‍ॅनिमेशन ही दोन क्षेत्रे हमखास नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतात. जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून विमान प्रवासाचे दर थोडे कमी झाले व स्वप्नवत वाटणारा विमानप्रवास आता मध्यमवर्गीय भारतीयही करू लागला. राष्ट्रीय विमान कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आली व अनेक खासगी कंपन्या रिंगणात उतरल्या. याची परिणती म्हणून विमानसेवेच्या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्या. विमानसेवेचे क्षेत्र प्रतिष्ठेचे आहे व उत्पन्नही चांगले मिळते. त्यामुळे बारावी कला शाखा पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी आता या क्षेत्राकडे वळू लागले आहेत. युवक-युवतींसाठी खासगी प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध आहेत. या प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कला, वाणिज्य व विज्ञान यांपैकी कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक असते, तसेच मौखिक परीक्षेचे आव्हानही तितकेच महत्त्वाचे असते. मौखिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एक वर्ष प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर वैयक्तिक कुवतीनुसार व विविध विमान कंपन्यांच्या मुलाखतींमधील यशस्वितेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. या प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर युवकांच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल होतो. प्रशिक्षणानंतर तरुणांचे व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक व प्रभावी बनून त्यांच्यातील आत्मविश्‍वासात विलक्षण वाढ होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सौंदर्यदृष्टी असलेल्या व कलासक्त मन असलेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅनिमेशनसारखे दुसरे क्षेत्र नाही. दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर खासगी प्रशिक्षण केंद्रांमध्ये सहा महिन्यांपासून अडीच वर्षांपर्यंतच्या कालावधीचे वे डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, थ्री डी अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड स्पेशल इफेक्ट इत्यादी पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. राज्य शासनाच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अ‍ॅनिमेशन क्षेत्रात प्रगती करणे सुलभ जाते. परंतु, या चित्रकलेच्या परीक्षा उत्तीर्ण न झालेले विद्यार्थीही अ‍ॅनिमेशन क्षेत्रातील पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व प्रशिक्षण केंद्रांमध्ये विशेष मार्गदर्शनही केले जाते.

शासनमान्यता नसलेले हे पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना वेब डिझायनर, ग्राफिक डिझायनर, अ‍ॅनिमेटर म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. अनेक कंपन्यांमध्ये पदवीधर युवकांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे अ‍ॅनिमेशनच्या पदविका अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे हितावह ठरते. बारावीनंतर फाइन आर्टस आणि कमर्शिअल आर्टसमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारा विद्यार्थी अ‍ॅनिमेशन क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवू शकतो. पुणे शहराची ‘अ‍ॅनिमेशन क्षेत्राची पंढरी’ होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. या क्षेत्रात अनेक उत्तमोत्तम संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी ही वेगळी पाऊलवाट निवडायला हरकत नाही.
चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, बारावीनंतर काय करायचं ते ठरवताय ना? तुमच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

सर्व क्षेत्रांत संधी
बी.ए., बी.पी.एड. किंवा डी. एड. केल्यास शैक्षणिक क्षेत्रात संधी मिळते. जर्मन, जपान, रशियन, स्पॅनिश अशा परकीय भाषांची पदविका घेतल्यास अनुवादक म्हणून काम करता येते. पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास विविध प्रसारमाध्यमांत काम करता येते. इव्हेन्ट मॅनेजमेंट करणार्‍यांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करता येते. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणार्‍यांना हॉटेलिंग क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Career opportunities after 12th Std