अर्थशास्त्र (इकॉनॉमिक्स) आणि सांख्यिकी (स्टॅटिस्टिक्स) हे दोन विषय करिअरसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. हे दोन्ही विषय परस्परांशी निगडित असले तरी त्यांच्या अभ्यासक्रमातील दृष्टिकोन, संधी आणि कौशल्ये यात फरक दिसून येतो..तुलनात्मक दृष्टिकोनअर्थशास्त्र हा विषय समाजातील संसाधनांचा वापर, उत्पादन, वितरण आणि मागणी-पुरवठ्याच्या सिद्धांतांवर आधारित असतो. यात आर्थिक धोरणे, उद्योगधंदे, बाजारपेठ, वित्तीय संस्था व सरकारी निर्णयांचा अभ्यास होतो. सांख्यिकी विषय आकडेवारीवर आधारित असून, त्यात डेटाचे संकलन, विश्लेषण, निष्कर्ष काढणे व भविष्यातील अंदाज मांडणे यावर भर दिला जातो. साधारणपणे अर्थशास्त्र हे तत्त्वज्ञान व धोरणात्मक विश्लेषणावर केंद्रित असते, तर सांख्यिकी हे गणितीय व तांत्रिक पद्धतींवर आधारित असते..बारावीनंतरचे मार्गबारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असतील तर त्यांना बी.ए. किंवा बीएस्सी (अर्थशास्त्र) किंवा बीएस्सी. (सांख्यिकी) हा अभ्यासक्रम निवडता येतो. बारावीनंतर प्रवेशासाठी गणित किंवा सांख्यिकी विषय घेतले असल्यास अधिक फायदा होतो. पुढे पदव्युत्तर, संशोधन किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी हे दोन्ही विषय पायाभूत ठरतात..कोणी निवडावे?ज्यांना आर्थिक चढ-उतार, बाजारपेठेतील बदल, शासन धोरणे याबाबत रस आहे त्यांनी अर्थशास्त्र निवडावे, तर गणित, डेटाचे विश्लेषण, संशोधन, सॉफ्टवेअर यामध्ये प्रावीण्य आहे, त्यांनी सांख्यिकीचा अभ्यासक्रम निवडावा. दोन्ही विषयांसाठी विश्लेषण क्षमता, तार्किक विचारसरणी व समस्यांचे निराकरण करण्याची वृत्ती आवश्यक असते..करिअरअर्थशास्त्र शिकलेल्या विद्यार्थ्यांना बँका, वित्तीय संस्था, सरकारी सेवा, आंतरराष्ट्रीय संस्था, संशोधन संस्था, उद्योगधंदे, कॉर्पोरेट क्षेत्र तसेच अध्यापन क्षेत्रात करिअर करता येते. सांख्यिकी शिकलेल्यांना विमा कंपन्या, आयटी, डेटा सायन्स, मार्केट रिसर्च, जनगणना विभाग, कृषी व आरोग्य संशोधन, औषधनिर्मिती उद्योग तसेच बिग डेटा ॲनालेसिस क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. सरकारी सेवेत भारतीय आर्थिक सेवा व भारतीय सांख्यिकी सेवा या प्रतिष्ठित सेवा मानल्या जातात..प्रवेशासाठीच्या अटीबारावीमध्ये गणित, सांख्यिकी किंवा वाणिज्य विषय घेतलेले विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र असतात. सीयूईटी किंवा विद्यापीठ स्तरावरील प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश दिला जातो. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी संबंधित पदवी आवश्यक असते..उपलब्ध अभ्यासक्रमअर्थशास्त्रासाठी बी.ए. अर्थशास्त्र, एम.ए. अर्थशास्त्र, एम.फिल., पीएच.डी. तसेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, विकास अर्थशास्त्र, वित्तीय अर्थशास्त्र अशा विशेष शाखा उपलब्ध आहेत. सांख्यिकीसाठी बी.एस्सी. सांख्यिकी, एम.एस्सी. सांख्यिकी, ॲक्चुरियल सायन्स, डेटा ॲनालिटिक्स, बायोस्टॅटिस्टिक्स यासारखे कोर्सेस उपलब्ध आहेत..प्रमुख संस्थाआयआयटी, आयआयएम, बिट्स, आयसर भोपाळ, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारतीय सांख्यिकी संस्था (कोलकता, बेंगळूर, दिल्ली), दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, मुंबई विद्यापीठ या प्रमुख संस्था मानल्या जातात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.