career options and job opportunities for MCA graduate nagpur news
career options and job opportunities for MCA graduate nagpur news

MCA पदवीधरांसाठी चांगल्या नोकरीची संधी, वाचा किती मिळतो पगार?

नागपूर : दिवसेंदिवस IT सेक्टरचा विकास होत आहे. आता तर अशी वेळ आली आहे की, टेक्नॉलॉजीशिवाय आपण कोणता विचारही करू शकत नाही. याच क्षेत्रात जर तुम्हाला करिअर करायचे असेल तर MCA म्हणजेच मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लीकेशन हा एक चांगला पर्याय आहे. IT सेक्टरमध्ये MCA ची पदवी असणाऱ्या लोकांची मागणी वाढली आहे. मात्र, त्यांच्याकडे एनालिटिक्स आणि भाषा कौशल्य असणे गरजेचे आहे. ही दोन कौशल्य असतील तर तुम्हाला कुठेही चांगला जॉब मिळू शकतो. इतकेच नाहीतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील MCA पदवीधरांची मागणी आहे. 

MCA पदवीधरांसाठी नोकरीच्या संधी :
MCA मध्ये अनेक क्षेत्र येतात. तुम्ही तुमची आवड, कौशल्य या आधारावर एक क्षेत्र निवडू शकता. त्यासाठी खाली दिलेले अनेक पर्याय उपलब्ध आहेत. -

अ‌ॅप डेव्हलपर -
आजकाल मोबाईल आणि त्यावर असणाऱ्या अॅप्सचे प्रत्येकाच्या जीवनात महत्व आहे. कोणत्याही वस्तू किंवा सेवा खरेदीसाठी आपण मोबाईलवरील अॅपचा वापर करत असतो. त्यामुळे अॅप डेव्हलपरची मागणी वाढली आहे. IOS, android, blackberry आणि विंडोज प्लॅटफॉर्मच्या मोबाइल अॅप्लीकेशन तयार करणे, या गोष्टींचा यामध्ये समावेश होतो. तसेच प्रत्येक कंपनी देखील आपल्या सेवा किंवा वस्तूंचे मार्केटींग करण्यासाठी अॅपचा वापर करतात. त्यामुळेच एक अॅप डेव्हलपर म्हणून तुम्हाला सहज कुठल्याही कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो.

बिजनेस अॅनालिस्ट -
तुमच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचे अॅनालिसिस करण्याचे कौशल्य असेल आणि निर्णय घेण्याची क्षमता असेल तर तुम्ही बिजनेस अॅनालिस्ट हा जॉब अतिशय चांगल्या रितीने करू शकता. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बाबी माहिती करून त्यानुसार बदल करण्याच्या सूचना देणे हे अॅनालिस्टचे काम असते. तुम्ही MCA पदवीधर असाल आणि तुमच्याकडे चांगले डेटा क्रंचिंग कौशल्य असेल तर ही प्रोफाईल तुमच्यासाठीच आहे.

सॉफ्टवेअर डेव्हलपर -
MCA पदवीधर असलेले अनेक सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करण्यास पसंती देतात. यामध्ये सॉफ्टवेअर डिजाइन करणे, त्याची देखभाल करण्यासंबंधी कामे अलतात. तसेच ग्राहकांच्या सोयीनुसार त्या सॉफ्टवेअर निरीक्षण आणि विश्लेषण करून IT संबंधी सेवा पुरविणे हे सॉफ्टवेअर डेव्हलपरचे काम असते. तुमच्यामध्ये कोडींग करण्याचे चांगले कौशल्य असेल तुम्हाला या फिल्डमध्ये चांगले करिअर आहे.

ट्रबलशूटर -

कोणतीही कंपनी ट्रबलशूटरविना त्यांचे काम करू शकत नाही. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसंबंधी समस्या शोधणे आणि त्याचे निराकरण करणे हे ट्रबलशूटरचे काम असते. कोणत्याही कंपनीमध्ये IT संबंधी कुठलीही समस्या येते त्यावेळी ही समस्या समजून घेणे आणि त्याचे निराकरण करणे ही ट्रबलशूटरची जबाबदारी आहे. 

सिस्टम अॅनालिस्ट - 
व्यवसाय चालविण्यासाठी IT संबंधी विचार करणे आणि त्याला डिजाइन करणे हे एका सिस्टम अॅनालिस्टचे काम असते.  ग्राहकांच्या गरजेनुसार IT सोल्युशन सिस्टम डिजाइन करण्यासाठी बिजनेस, बिजनेस प्रोसेस आणि मॉडल्सचा विस्तार करणे गरजेचे आहे. सिस्टम अॅनालिस्ट हे ग्राहक आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर यांच्यामधील महत्वाचा दुआ म्हणून काम करते. 

सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन आर्किटेक्ट -
तुम्ही जर कुठलीही गोष्ट इमाजिनेश आणि व्हिज्युलाइज करू शकत असेल तर सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन आर्किटेक्ट तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. IT संबंधी प्रोडक्ट्स आणि सेवांसाठी डिजाइन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आर्किटेक्टचा समावेश असतो. टेक्निकल मॅनुअल्स आणि प्रोटोकॉल्स तयार करणे ही सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन आर्किटेक्टची महत्वपूर्ण जबाबदारी असते.

सॉफ्टवेअर कंसलटन्ट -
आजकाल कंसल्टेंसी हे महत्वपूर्ण करीअर आहे. बिजनेस प्रोसेसचे मुल्याकन आणि विश्लेषण करणे. त्यासोबतच बिजनेस चालविणय्ासाठी एक चांगले सॉफ्टवेअर सोल्युशन आणि तसेच गरजेचे फिडबॅक जमवणे हे सॉफ्टवेअर कंसलटन्टचे काम असते. सॉफ्टवेअर कंसलटन्टचे पहिले लक्ष हे कंपनीची सेल्स प्रोसेस वाढविण्यासाठी कॉस्ट इफेक्टिव्ह बिजनेस सोल्युशन तयार करणे हे आहे.

हेही वाचा -

हार्डवेअर इंजीनिअर - 
कोणत्याही हार्डवेअर इंजिनिअरिंगच्या जॉबमध्ये सर्किट बोर्ड्स, वायर्स, हार्ड डिस्क, प्रिंटर्स, कम्प्यूटर चिप्स, राऊटर्स आणि कीबोर्ड्स आदींचा समावेश असतो. कम्प्युटर सिस्टम इन्सालेशन आणि टेस्टिंगसंबंधी कामे करण्यासाठी एक हार्डवेअर इंजिनिअरींगची महत्वाची भूमिका असते.

MCA प्रेशर्सला मिळणारा पगार -
MCA पदवीधर असणाऱ्या उमेदवाराला सुरुवातीला टॅलेंट आणि कौशल्यावर आधारीत पगार मिळत असतो. तसेच तुमचे कार्यक्षेत्र कोणते आहे त्यावर देखील पगार अवलंबून असतो. 

  • अॅप डेव्हलपर - २० ते ३५ हजार रुपये
  • IT असिस्टंट - १० ते २० हजार रुपये
  •  हार्डवेअर इंजिनिअरींग - १५ ते २५ हजार रुपये
  • सॉफ्टवेअर इंजिनिअर - २१ ते ४७ हजार रुपये
  • वेब डिजानयर - २५ ते ५५ हजार रुपये

देशातील या शहरामध्ये मिळेल चांगले जॉब्स -
तुम्ही MCA पदवीधर असाल तर तुम्हाला देशातील या शहरांमध्ये चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

  • बँगलोर
  • चेन्नई
  • हैदराबाद
  • मुंबई
  • नवी दिल्ली
  • पुणे 

या कंपनी पुरवितात जॉब्स 

  • विप्रो
  • इंफोसिस
  • इंफोटेक
  • सत्यम महिंद्रा
  • आईबीएम
  • एचसीएल
  • टाटा कंसल्टेंसी सर्विसेज
  • एक्सेंचर
  • कैपजेमिनी
  • कॉग्निजेंट  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com