esakal | कोविड योद्ध्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५० लाखांचा धनादेश, राज्यातील पहिलीच मदत
sakal

बोलून बातमी शोधा

50 lakh rupees cheque help to corona fighters usha pund in amravati

अंगणवाडी सेविका या तुटपुंज्या मानधनावर काम करतात. मात्र, कोरोना काळात पुढाकार घेत त्यांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. तसेच सर्व्हे करण्यात आली शासनाला मदत केली.

कोविड योद्ध्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून ५० लाखांचा धनादेश, राज्यातील पहिलीच मदत

sakal_logo
By
सुरेंद्र चापोरकर

अमरावती : कोरोना काळात प्रतिबंधक उपायोजनांच्या अंमलबजावणी कार्य करणारे कोविड योद्धांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला, तर त्यांना ५० लाख रुपयांची मदत शासनाकडून घोषित करण्यात आली होती. त्यानुसार रामा येथील दिवंगत अंगणवाडी सेविका उषा पुंड यांच्या कुटुंबीयांना ठाकरे सरकारतर्फे ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेशाद्वारे ही रक्कत पीडित कुटुंबीयांना देण्यात आली.  

हेही वाचा - मिरची घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या भिवापुरी...

अंगणवाडी सेविका या तुटपुंज्या मानधनावर काम करतात. मात्र, कोरोना काळात पुढाकार घेत त्यांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. तसेच सर्व्हे करण्यात आली शासनाला मदत केली. यामध्येच राज्यातील ८ अंगणवाडी सेविकांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे उषा पुंड यांचे देखील कोरोनाच्या लढाईत मोठे योगदान आहे. आपल्या प्राणांची बाजी लावून गत एक वर्षांपासून लढवय्या वृत्तीने सेविका कार्यरत आहेत. याच लढाईत शहीद झालेल्या उषाताई पुंड यांचे देशासाठी व समाजासाठीचे योगदान अमूल्य आहे. शासन कोरोना लढवय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्यांनी उषा पुंड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पुंड कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना दिलासा दिला.

हेही वाचा - साहेबऽऽ कोरोनामुळे नंतर मृत्यू येईल; भुकेमुळे आधीच मृत्यू येण्याची भीती; हातावरच्या पोटाला पुन्हा...

आशा व अंगणवाडी सेविकांनी कोरोना काळात मोलाचे योगदान दिले व देतही आहेत. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पुंड यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. मी स्वतःही एक कुटुंबीय म्हणून या सर्वांसोबत राहीन. एकात्मिक बालविकास योजनेत कोरोनाकाळात सेवारत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका यांचे निधन झाल्यास सहाय्य दिले जाते. या काळात हौतात्म्य आलेल्या सर्व सेविकांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. उपस्थित आशा सेविका, पर्यवेक्षक यांच्याशीही त्यांनी संवाद साधला.

loading image