करिअर वेध : रोल मॉडेल अर्थात आदर्श व्यक्तिमत्त्व

आदर्श व्यक्तिमत्त्वांच्या गुणांमधून प्रेरणा घेऊन स्वतःची ओळख घडवा, अंधानुकरणाऐवजी व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्या
Learn from your role model. Become one someday.

Learn from your role model. Become one someday.

Sakal

Updated on

विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी रोल मॉडेल असतोच. समजायचे वय येते तेव्हापासून प्रत्येक माणूस कोणाला तरी आदर्श म्हणून अनुकरण करत असतो. सामान्यतः सगळ्यांच्या आयुष्यात लहानपणी आपले आई-वडील व शिक्षक हेच आदर्श असतात आणि ते कायमच राहतात. वय वाढते, बाहेरील जगाशी संबंध येऊ लागतो, आणि आयुष्याची दिशा ठरत जाते, तसे प्रत्येकाच्या आयुष्यात एक किंवा अनेक रोल मॉडेल्स नव्याने जन्म घेतात. हे आदर्श व्यक्तिमत्त्व तुमच्या आयुष्यावर पगडा निर्माण करतो व तुम्ही नकळत त्यांच्या गोष्टींचे अनुकरण करू लागता. माणसाला आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे आदर्श नक्कीच असू शकतात, तुमच्या व्यवसायाप्रमाणे आदर्श असणे अगदी स्वाभाविक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com