

Mental flexibility and adaptability are essential skills for handling challenges and growing in life.
Sakal
विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर
शारीरिक लवचीकतेबरोबर मानसिक लवचीकता महत्त्वाची आहे. मानसिक लवचीकता हरवून बसलात तर तुमचे संपूर्ण आयुष्य व तुमची निर्णय क्षमता उद्ध्वस्त होऊ शकते. तुम्ही कोणताही खेळ घ्या, त्यामध्ये शारीरिक लवचीकता महत्त्वाची ठरते व तुमची कामगिरी त्याच्याशी थेट निगडित आहे. त्याबरोबर मानसिक लवचीकता ठेवल्यास आयुष्यात कमी ताणतणावाचा सामना करावा लागतो.