CBSE 10th Results 2022 : 10 वीचा निकाल लांबणीवर, विद्यार्थ्यांना पाहावी लागणार वाट

cbse 10th result 2022
cbse 10th result 2022 Sakal

CBSE 10th Results 2022 : देशभरातील लाखो विद्यार्थी दहावीच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच यंदाचा CBSE १० वीचा निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात होते की, CBSE १० वीचा निकाल ४ जुलै 2022 रोजी प्रसिद्ध होईल, परंतु आज देखील निकाल आज जाहीर होणार नसल्याची समोर आल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

कधी लागू शकतो निकाल?

या निकालाची लाखो विद्यार्थी वाट पाहात आहेत, त्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. काही न्यूज पोर्टल्सकडून ४ जुलै रोजी सीबीएसई १० वीचा निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते, पण आता त्याला विलंब होणार आहे. बोर्डाने देशभरात सीबीएसई टर्म २ इयत्ता १०वीची परीक्षा २६ एप्रिल ते २४ मे दरम्यान घेतली होती. दरम्यान जुलै महिन्याचा अखेरीस हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दावा केला आहे की, सीबीएसई 10 जुलै रोजी निकाल जाहीर करू शकते. त्याचबरोबर टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये १५ जुलै रोजी निकालाचा दावा करण्यात आला आहे.

cbse 10th result 2022
हॉटेल, रेस्टॉरंटच्या बिलातील सर्व्हिस चार्जबाबत सरकारचा मोठा निर्णय!

निकाल कुठे पाहाता येईल?

दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर CBSE चे विद्यार्थी हा निकाल अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in, cbse.gov.in आणि results.gov.in वर ऑनलाइन पाहू शकतील. या व्यतिरिक्त, विद्यार्थी डिजिलॉकर वेबसाइट, अॅप किंवा एसएमएस किंवा उमंग अॅपद्वारे सीबीएसई इयत्ता १० वी चा निकाल पाहू शकतात.

cbse 10th result 2022
भुजबळांमुळे ४० दिवस जेलमध्ये टाकलं; CM शिंदेंनी सांगितला तो किस्सा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com