
विद्यार्थ्यांचा मानसिक तणाव होणार दूर, 'सीबीएसई'ने घेतला मोठा निर्णय
CBSE Latest News : सध्या जगावर कोरोना महामारीचं संकट उभं ठाकलं आहे. त्यातच आता शैक्षणिक संस्था बंद पडल्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडलेत. शाळेत न गेल्याने व घरीच राहिल्याने विद्यार्थ्यांत मानसिक तणाव वाढत आहे. आता हा मानसिक ताण दूर करण्यासाठी सीबीएसई वेगवेगळ्या पद्धतींवर काम करत आहे. फ्रेंड्स फॉर लाइफ आणि मेंटल हेल्थ अँड वेल्बीइंग नावाची पुस्तिका प्रसिद्ध झाल्यानंतर, सीबीएसई 12 मे रोजी हेल्थ अँड वेलनेस सीरिजअंतर्गत पहिले थेट वेबिनार आयोजित करत आहे. याची थीम : केयर, कॉपेशन अॅंड कम्युनिकेशन - वे स्टोअर टू स्ट्रेस फ्री लिव्हिंग अशी आहे. दरम्यान, ही वेबिनार आज 12 मे रोजी सायंकाळी 4 ते 5:30 या वेळेत आयोजित केली जाणार आहे. (CBSE Board New Activity For Student Health)
वेबिनारमध्ये शिक्षक, पालकही सहभागी होणार
या वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांव्यतिरिक्त शिक्षक, पालकही सहभागी होऊ शकतात. यात सीबीएसईचे अध्यक्ष मनोज आहुजा, पीआरओ रमा शर्मा, मॉडिरेटर डॉ. जीतेंद्र नागपाल, डॉ. वंदना मिश्रा, एमएचआरडीच्या डॉ. सुधा आचार्य, डॉ. ज्ञानदीप कौर गुलाटी आदी सहभागी राहणार आहेत.
सीबीएसईच्या गुरुनानक स्कूलचे माजी प्राचार्य डॉ. मनोहर लाल म्हणाले, कोरोना संकटात सीबीएसईने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची मानसिक स्थिती लक्षात घेऊन आरोग्य आणि निरोगीपणाची मालिका सुरू केलीय. या मालिकेतील पहिल्या वेबिनारमध्ये स्वतःची काळजी घेणे, इतरांवर दया आणि एकमेकांशी संवाद साधण्यावर केंद्रित आहे. सीबीएसईच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना कोणत्याही ताणतणावाशिवाय परीक्षेची तयारी करण्यास मदत होणार आहे.
CGL, CHSL, GD परीक्षा स्थगित; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर SSC आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
CBSE Board New Activity For Student Health
Web Title: Cbse Board New Activity For Student
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..