CTET परीक्षेच्या तारखा जाहीर; 20 सप्टेंबरपासून Registration सुरू

CBSE CTET 2021
CBSE CTET 2021esakal

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (Central Board of Secondary Education) शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. CTET परीक्षेची 15 वी संगणक आधारित चाचणी 16 डिसेंबर 2021 ते 13 जानेवारी 2022 दरम्यान आयोजित केली जाणार असून ही परीक्षा देशभरातील 20 भाषांमध्ये घेतली जाईल. परीक्षा, अभ्यासक्रम, पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षा शहर आणि महत्वाच्या तारखा ह्या केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवर ctet.nic.in उपलब्ध करण्यात येणार आहेत.

Summary

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं शिक्षक पात्रता परीक्षेच्या (CTET) तारखा नुकत्याच जाहीर केल्या आहेत.

दरम्यान, इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून माहिती डाउनलोड करण्याची आणि अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचण्याची विनंती सीबीएसईकडून करण्यात आलीय. उमेदवारांना केवळ CTET वेबसाइटद्वारे ctet.nic.in ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणार असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे, तर 20 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3:30 पर्यंत फी भरता येणार आहे.

CBSE CTET 2021
निमलष्करी दलात तब्बल 25,271 जागा रिक्त; 'या' दिवशी होणार परीक्षा

या परीक्षेकरिता सामान्य/ओबीसी उमेदवारांना एका पेपरसाठी 1000 रुपये, तर दोन्ही पेपरसाठी 1200 रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तसेच एससी/एसटी/पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी एका पेपरला 500 व दोन्ही पेपरसाठी 600 रुपये अर्ज फी द्यावी लागणार आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या पॅटर्नमध्ये सुधारणा करण्याबाबत सीबीएसईने जुलै 2021 मध्ये अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेनुसार, यात काही बदलही करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com