CBSE New Rule: 'तिसरी भाषा' नापास? बोर्डाचं सर्टिफिकेट अडकणार! १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा नियम

3 Languages Mandatory?: १०वी बोर्डात तिसऱ्या भाषेचा पेपर नाही, पण पास होणे बंधनकारक; CBSE कडून 'त्रि-भाषा' नियमांविषयी मोठे स्पष्टीकरण
CBSE New Guidelines for 3-Language Policy

CBSE New Guidelines for 3-Language Policy

esakal 

Updated on

CBSE New Guidelines for 3-Language Policy: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) अंतर्गत 'त्रि-भाषा सूत्रा'बाबत (Three-Language Policy) अत्यंत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नववीत प्रवेश घेणाऱ्या आणि २०२७-२८ मध्ये दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे नवीन नियम लागू असणार आहेत.

सीबीएसईने स्पष्ट केले आहे की, दहावीच्या बोर्ड परीक्षेत तिसऱ्या भाषेचा (R3) मुख्य पेपर असणार नाही. पण, विद्यार्थ्यांना दहावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र (Class 10 Pass Certificate) मिळवण्यासाठी शाळेच्या पातळीवर होणाऱ्या अंतर्गत मूल्यमापन परीक्षेत (School-based Assessment) पास होणे अनिवार्य असेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com