CBSE लवकरच जारी करेल 10वी-12वी टर्म 1 बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र

CBSE लवकरच जारी करणार दहावी-बारावी टर्म 1 बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र!
CBSE
CBSEsakal media
Summary

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच 2021-22 या शैक्षणिक वर्षात माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक वर्गांच्या टर्म 1 बोर्ड परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करेल.

सोलापूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education - CBSE) लवकरच 2021-22 या शैक्षणिक वर्षात माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक वर्गांच्या टर्म 1 बोर्ड परीक्षेसाठी (Board Exam) प्रवेशपत्र (Admit Card) जारी करेल. CBSE टर्म 1 ऍडमिट कार्ड 2021 बोर्डाकडून अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर जारी करण्यात येईल. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर CBSE पोर्टलवर सक्रिय होणाऱ्या लिंकवरून विद्यार्थी त्यांचे CBSE बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहावे, कारण बोर्डाकडून प्रवेशपत्राची हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही.

नोव्हेंबरच्या मध्यापासून परीक्षा सुरू होतील

सीबीएसईने यापूर्वी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा टर्म 1 आणि टर्म 2 या दोन टप्प्यांत घेण्यात येतील, असे जाहीर केल्यानंतर टर्म 1 परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. तसेच, या वेळी बोर्डाने दोन्ही विषयांसाठी स्वतंत्र वेळापत्रके जारी केली आहेत. याबरोबरच बोर्डाने ज्या विषयांना विद्यार्थ्यांची संख्या जास्त त्याला मेजर सब्जेक्‍ट आणि इतर मायनर सब्जेक्‍ट म्हणून विभागले आहेत.

CBSE
SBI मध्ये 2056 PO पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी!

CBSE बोर्ड टर्म 1 परीक्षा 2021 च्या मायनर सब्जेक्‍टच्या डेटशीटनुसार, इयत्ता 12वीच्या परीक्षा 16 नोव्हेंबरपासून आणि 10वीच्या परीक्षा 17 नोव्हेंबरपासून सुरू होतील. त्याचप्रमाणे, प्रमुख विषयांसाठी सीबीएसई टर्म 1 डेटशीट 2021 नुसार, दहावीच्या परीक्षा 30 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2021 दरम्यान, तर बारावीच्या परीक्षा 1 डिसेंबर ते 22 डिसेंबर दरम्यान घेण्यात येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com