14 नोव्हेंबरला होणाऱ्या UPSC NDA (2) परीक्षेची केंद्रे जाहीर! जाणून घ्या मार्गदर्शक तत्त्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

14 नोव्हेंबरला होणाऱ्या UPSC NDA (2) परीक्षेची केंद्रे जाहीर!
14 नोव्हेंबरला होणाऱ्या UPSC NDA (2) परीक्षेची केंद्रे जाहीर!

14 नोव्हेंबरला होणाऱ्या UPSC NDA (2) परीक्षेची केंद्रे जाहीर!

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 14 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (National Defense Academy - NDA) आणि नौदल अकादमी (Naval Academy - NA) परीक्षा (2) साठी केंद्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. विद्यार्थी खाली दिलेल्या यादीतील शहरांची नावे तपासू शकतात. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी महिला देखील या परीक्षेला पहिल्यांदाच बसल्या आहेत.

हेही वाचा: डिसेंबर-जानेवारीत महाविद्यालयांची ऑफलाईन परीक्षा !

या शहरांमध्ये असतील परीक्षा केंद्रे

आगरतळा, अहमदाबाद, आयजोल, प्रयागराज (अलाहाबाद), बंगळूर, बरेली, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, कटक, डेहराडून, दिल्ली, धारवाड, दिसपूर, गंगटोक, हैदराबाद, इंफाळ, इटानगर, जयपूर, जम्मू, जोरहाट, कोची, कोहिमा, कोलकाता, लखनौ, मदुराई, मुंबई, नागपूर, पणजी (गोवा), पाटणा, पोर्ट ब्लेअर, रायपूर, रांची, संबलपूर, शिलॉंग, शिमला, श्रीनगर, तिरुवनंतपुरम, तिरुपती, उदयपूर आणि विशाखापट्टणम.

UPSC ने 14 नोव्हेंबर 2021 रोजी NDA (2) 2021 च्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी COVID-19 संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर प्रोटोकॉल लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीत, खाली UPSC NDA आणि NA II 2021 परीक्षेसाठी जारी केलेल्या सूचना वाचू शकता.

परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी नियमावली

सर्व उमेदवारांसाठी मास्क / फेस कव्हर घालणे अनिवार्य आहे. मास्क / फेस कव्हर नसलेल्या उमेदवारांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तथापि, परीक्षा अधिकाऱ्यांच्या आवश्‍यकतेनुसार पडताळणीसाठी उमेदवारांना मास्क व फेस कव्हर काढावे लागतील. उमेदवार छोट्याशा बाटलीत स्वतःचे हॅंड सॅनिटायझर घेऊन जाऊ शकतात. उमेदवारांनी कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून परीक्षा हॉल / खोल्यांमध्ये तसेच केंद्राच्या आवारात सोशल डिस्टन्सिंग तसेच वैयक्तिक स्वच्छता पाळणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: B.Tech अन्‌ MBA उत्तीर्णांसाठी ITI लिमिटेडमध्ये नोकरीची मोठी संधी!

परीक्षा हॉलमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक सत्रात ई प्रवेशपत्रासोबत (मूळ) फोटो ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल. फोटो अस्पष्ट असल्यास किंवा ई-प्रवेशपत्रावर उपलब्ध नसल्यास, उमेदवारांना दोन समान छायाचित्रे (प्रत्येक सत्रासाठी एक छायाचित्र) बाळगण्याचा सल्ला दिला आहे. ई-ऍडमिट कार्डमध्ये काही तफावत आढळून आल्यास usnda-upsc@nic.in या ई-मेल आयडीवर तत्काळ आयोगाला कळवावे लागेल.

loading image
go to top