केंद्रीय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू; आवश्यक कागदपत्रांची पहा यादी I KVS Admission 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central School Admission 2022

इयत्ता दुसरी ते 10 वीच्या प्रवेश नोंदणीची प्रक्रिया 8 एप्रिलपासून सुरू होणार आहे.

केंद्रीय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू; आवश्यक कागदपत्रांची पहा यादी

KVS Admission 2022 : केंद्रीय विद्यालयातील प्रवेशासाठी (Central School Admission 2022) नोंदणीची प्रक्रिया आज 28 फेब्रुवारीपासून सुरू झालीय. इयत्ता पहिलीची प्रवेश नोंदणी आज सकाळी 10 वाजता सुरू झाली. दरम्यान, यासाठीचा ऑनलाइन नोंदणी फॉर्म अधिकृत वेबसाइटवर kvsonlineadmission.kvs.gov.in सबमिट करु शकता. इयत्ता पहिलीच्या प्रवेश नोंदणीची प्रक्रिया 21 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

दरम्यान, इयत्ता दुसरी ते 10 वीच्या प्रवेश नोंदणीची प्रक्रिया 8 एप्रिलपासून सुरू होणार असून ती 16 एप्रिल 2022 पर्यंत चालणार आहे. अर्ज केवळ नमूद केलेल्या अधिकृत वेबसाइटवर सबमिट करणं आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी पालकांनी वेबसाइटवर दिलेली संपूर्ण माहिती वाचावी व शुल्कासह अर्ज करावा.

हेही वाचा: डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची संधी; BSNL मध्ये 'या' जागांसाठी होणार भरती

आवश्यक कागदपत्रांची यादी

पालकांनी खालील कागदपत्रं तयार ठेवणं आवश्यक आहे.

  • प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलाचा फोटो किंवा स्कॅन केलेला फोटो (जास्तीत-जास्त 256 KB आकाराची JPEG फाइल)

  • मुलाचे जन्म प्रमाणपत्र

  • जातीचा दाखला (SC, ST, OBC)

  • पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र

  • राहण्याचा संपूर्ण पत्ता

हेही वाचा: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, लगेच करा अर्ज; 'ही' आहे शेवटची तारीख

इयत्ता पहिलीची प्रवेश यादी 25 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध केली जाईल. पहिल्या यादीनंतर जागा रिक्त राहिल्यास, दुसरी आणि तिसरी यादी अनुक्रमे 1 एप्रिल आणि 8 एप्रिल रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, पालक केंद्रीय विद्यालयाच्या अधिकृत वेबसाइटवर इतर कोणतीही माहिती तपासू शकतात.

Web Title: Central School Registration Begins Check List Of Important Documents Official Website Kvs Admission 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :government school
go to top