esakal | केंद्रीय विद्यापीठांमध्ये सहा हजारांहून अधिक शिक्षकांची होणार भरती! या आठवड्यात होईल अधिसूचना जारी
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय विद्यापीठांमध्ये सहा हजारांहून अधिक शिक्षकांची होणार भरती!

अध्यापन क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते.

केंद्रीय विद्यापीठांमध्ये सहा हजारांहून अधिक शिक्षकांची होणार भरती

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : अध्यापन क्षेत्रात सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरू शकते. देशभरातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये (Central Universities) शिक्षक भरती (Teacher recruitment) प्रक्रिया लवकरच सुरू होईल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी 45 केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत नुकत्याच झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान या संदर्भात निर्देश दिले आहेत. ते म्हणाले, शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व संस्थांनी मिशन मोडमध्ये काम केले पाहिजे. याअंतर्गत सर्व विद्यापीठे आरक्षित प्रवर्गातील रिक्त शिक्षक पदे भरण्यासाठी पुढील आठवड्यात सर्व संस्थांना संबंधित जाहिराती जारी करण्यासाठी 6 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान वेळ दिला आहे.

हेही वाचा: 'कोल इंडिया'मध्ये नोकरीची उत्तम संधी! 9 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील विद्यापीठांमध्ये एकूण सहा हजार 229 शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यापैकी एससीसाठी 1012, एसटीसाठी 592, इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) 1767, ईडब्ल्यूएससाठी 805 आणि दिव्यांग श्रेणीसाठी 350 जागा रिक्त आहेत. उर्वरित सामान्य श्रेणीतील पदे आहेत. दिल्ली विद्यापीठासह 44 केंद्रीय विद्यापीठांपैकी 15 विद्यापीठांमध्ये मंजूर शिक्षकांच्या 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. अलाहाबाद विद्यापीठ आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओडिशामध्ये शिक्षकांच्या पदांवर 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत.

हेही वाचा: शाळा सुरु करण्याचा अ‍ॅक्‍शन प्लॅन तयार! चिमुकली शिक्षकांबाबतच अनभिज्ञ

शिक्षणमंत्र्यांनी या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. यादरम्यान त्यांनी केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंना त्यांच्या विद्यापीठांमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यास सांगितले, जेणेकरून देशात क्रीडा संस्कृतीला चालना मिळू शकेल. यासोबतच शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीबाबत 45 केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा केली. त्याचबरोबर शैक्षणिक सत्राबाबत म्हणाले की, विद्यापीठाने लवकरच परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.

loading image
go to top