esakal | CET 2021 : 15 सप्टेंबरपासून CET परीक्षेला सुरुवात; तब्बल 8 लाख विद्यार्थी देणार 'परीक्षा'
sakal

बोलून बातमी शोधा

Exam

सीईटी सेल महाराष्ट्राने MHT CET 2021 परीक्षेच्या तारखांचे नुकतेच वेळापत्रक जाहीर केले आहे.

CET 2021 : 15 सप्टेंबरपासून CET परीक्षेला सुरुवात

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, सीईटी सेल महाराष्ट्राने MHT CET 2021 परीक्षेच्या तारखांचे नुकतेच वेळापत्रक जाहीर केले असून याला मंत्री उदय सामंत यांनी देखील दुजोरा दिलाय. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियात MHT CET परीक्षेचं बनावट वेळापत्रक व्हायरल होत होतं. मात्र, आज खुद्द मंत्री सामंत यांनीच परीक्षेसंदर्भात मोठी घोषणा केलीय. एमबीए, एमएमएस, एमसीए, ए. आर्च, आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी MHT CET 2021 परीक्षा घेण्यात येते. ही CET परीक्षा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत होणार असून या परीक्षेला आठ लाख 55 हजार विद्यार्थी बसणार आहेत.

या CET परीक्षानंतर 1 नोव्हेंबरपर्यंत कॉलेज सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या परीक्षेच्या कालावधीत मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन या परीक्षा 15 सप्टेंबरपासून सुरु होतील, तर मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन परीक्षा 16, 17 व 18 सप्टेंबरला होणार आहे. या शिवाय, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ एज्युकेशन परीक्षा तीन ऑक्टोबर रोजी, तर फिजिकल एज्युकेशन परीक्षा 3, 4 ,5, 6, 7 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्याचबरोबर एज्युकेशन जनरल परीक्षा 6 आणि 7 ऑक्टोबरला व बॅचलर ऑफ फाइन अर्ट 9, 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या परीक्षांचा निकाल 20 ऑक्टोबर रोजी लागणार असल्याचे बोर्डाने स्पष्ट केलेय. या परीक्षेला तब्बल आठ लाख 55 हजार विद्यार्थी बसणार आहेत.

हेही वाचा: Railway Jobs 2021 : रेल्वेत 'या' पदांसाठी परीक्षा न घेता भरती

loading image
go to top