esakal | Railway Jobs 2021 : रेल्वेत 'या' पदांसाठी परीक्षा न घेता भरती; पगारही चांगला मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Jobs

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही महत्वाची बातमी आहे.

Railway Jobs 2021 : रेल्वेत 'या' पदांसाठी परीक्षा न घेता भरती

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Railway Jobs 2021 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही महत्वाची बातमी! कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या रिक्त जागा शिल्लक असून त्या लवकरच भरण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला जम्मू-काश्मीरमध्ये चालवल्या जाणाऱ्या USBRL प्रकल्पासाठी तांत्रिक सहाय्यकाची गरज आहे. यासाठी कोकण रेल्वेने अधिसूचना जारी केलीय. दरम्यान, तांत्रिक सहाय्यक पदावरील भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नसल्याचेही अधिसूचनेत स्पष्ट केलेय. या नोकरीशी संबंधित आवश्यक माहिती कोकण रेल्वेच्या वेबसाइटवरही konkanrailway.com उपलब्ध करण्यात आलीय.

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक नागरी पदासाठी सात रिक्त जागा, तर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक सिव्हिल पदासाठी देखील सात रिक्त जागा आहेत. या दोन पदांच्या रिक्त जागेत पाच जागा ओबीसी आणि दोन एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, यात सामान्य श्रेणीसाठी कोणतीही जागा रिक्त ठेवण्यात आलेली नाही.

हेही वाचा: 2357 च्या मेगा भरतीनंतर पोस्टात पुन्हा बंपर भरती

वयोमर्यादा

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदासाठी कमाल वय 30 वर्षे असावे, तर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यकासाठी कमाल वय 25 वर्षे असायला हवे. या दोन्ही पदांसाठी उमेदवारांचे वय 1 सप्टेंबर 2021 पासून मोजले जाणार आहे.

वेतन

निवड झालेल्या उमेदवारांना वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (नागरी) पदांवर दरमहा 35,000 दिले जातील, तर दुसरीकडे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (नागरी) पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 30 हजार रुपये मिळणार आहेत.

हेही वाचा: पोस्टात पुन्हा मेगा भरती; ग्रामीण भागात 4200 हून अधिक जागा भरणार

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक - BE/B.Tech सिव्हिल पदवी व किमान 60% गुणांसह उत्तीर्ण असणेही आवश्यक आहे.

वॉक इन इंटरव्ह्यू कधी होईल?

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक - 20 ते 22 सप्टेंबर, सकाळी 9:30 ते दुपारी 1.30 पर्यंत

कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक - 3 ते 25 सप्टेंबर, सकाळी 9:30 ते दुपारी 1.30 पर्यंत

loading image
go to top