

CET Cell Exam
ESakal
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीच्या पदवी पूर्व आणि पदव्युत्तर १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा २४ मार्च ते १६ मे या कालावधीत घेण्यात येत आहेत. या वर्षी प्रथमच सीईटी कक्ष विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षेची एक अस्थायी व एक अंतिम अशी दोन प्रवेशपत्रे उमेदवारांना उपलब्ध करून देणार आहे.