esakal | अकरावी प्रवेशासाठी 21 ऑगस्टला CET; प्रश्नपत्रिकेचं स्वरुप कसं?
sakal

बोलून बातमी शोधा

cet exam

करावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी घेण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेशासाठी 21 ऑगस्टला CET; प्रश्नपत्रिकेचं स्वरुप कसं?

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे - शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी येत्या २१ ऑगस्ट रोजी सामाईक प्रवेश  परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत सीईटी होणार आहे. राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी होणार असून  ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे एच्छिक असून ती ऑफलाइन स्वरूपाची असून राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.

CET परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका असणार आहे. या परीक्षेसाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘ http://cet.mh-ssc.ac.in’ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार असून अर्ज भरण्याची सुविधा येत्या मंगळवारपासून (ता.२०) उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना २६ जुलैपर्यंत या परीक्षेसाठी अर्ज भरता येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे.

हेही वाचा: दहावीनंतर पुढे काय! कोणत्या शाखेत करिअरची संधी?

अकरावी प्रवेशाची सीईटी परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असून त्यासाठी दोन तासांचा कालावधी असेल. परीक्षेची प्रश्नपत्रिका आठ माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल.  सेमी इंग्रजी या माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात निश्चित केलेल्या इंग्रजी आणि इतर माध्यमाचा विचार करून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येईल.

प्रश्नपत्रिका असेल या माध्यमात उपलब्ध

विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी, गुजराती, कन्नड, उर्दू, सिंधी, तेलुगु, हिंदी या माध्यमातून प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. तर सेमी इंग्रजी माध्यमाची निवड केलेल्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान विषयांचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून आणि सामाजिक शास्त्रे या विषयांचे प्रश्न विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या अन्य माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

प्रश्नपत्रिकेचे असे असेल स्वरूप :

- विषयाचे नाव : गुण

- इंग्रजी : २५ गुण

- गणित  (भाग एक आणि दोन) : २५

- विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग एक आणि दोन) : २५

- सामाजिक शास्त्रे (इतिहास, राज्यशास्त्र, भुगोल : २५

- एकूण : १००

loading image