CET Exam Timetable : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; CET परीक्षेच्या तारखा जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MHT-CET Exam Timetable

परीक्षांचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; CET परीक्षेच्या तारखा जाहीर

मागील काही दिवसांपूर्वी नीट आणि जीईई परीक्षांच्या तारखांचा विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र उच्च व तंत्र शिक्षण विभागकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मंत्री उदय सामंत यांनी यांसर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. आता या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल आहे. तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता वेळापत्रक जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. (MHT-CET Exam Timetable)

हेही वाचा: भुजबळांचा राज ठाकरेंना खोचक सवाल, म्हणाले तुम्ही कधी शाहु...

दरम्यान, शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा 3 ते 10 जून महिन्यात होणार होत्या. मात्र JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र या सर्व परीक्षांच वेळापत्रक जाहीर झालं आहे. वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षांच्या तारखां पुढे ढकलण्यात आले असून परीक्षांचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर http://mahacet.org प्रसिद्ध केले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रिकल्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. परीक्षेचे वेळापत्रक अजूनही प्रसिद्ध झालेले नव्हते, त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात होते. शिवाय एमबीए, एमसीए, लॉ, आर्किटेक्चर अशा महत्त्वाच्या अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश परीक्षेची नोंदणी आणि वेळापत्रक कधी जाहीर होणार, अशी विचारणा विद्यार्थी-पालकांकडून सुरु होती.
दरम्यान, आता या या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असल्याने विभागाने विद्यर्थ्यांना परीक्षेसाठी तयारी करण्यास सचूना केल्या आहेत.

हेही वाचा: हाडे अन् दात राहतील मजबूत; उन्हाळ्यात दही खाण्याचे फायदे

Web Title: Cet Exam Latest Update Time Table Declared By Department Of Higher And Technical Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top