भुजबळांचा राज ठाकरेंना खोचक सवाल, म्हणाले तुम्ही कधी शाहु...

'कालची राज ठाकरे यांची सभा शरद पवारांना जातीयवादी ठरवण्यासाठीच होती की काय?'
politics
politicsesakal
Summary

'कालची राज ठाकरे यांची सभा शरद पवारांना जातीयवादी ठरवण्यासाठीच होती की काय?'

मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना काल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेतली. यात ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकेची झोड उठवली. राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांच्या पुस्तकांवरुन शरद पवारांवर निशाणा साधला. पवारांनी कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा सभेत उल्लेख केला आहे का? असा सवाल ठाकरेंना केला होता. दरम्यान आता त्यांच्या या विधानाचा मंत्री छगन भुजबळ यांनी समाचार घेतला आहे. कालची राज ठाकरे यांची सभा शरद पवारांना (Sharad Pawar) जातीयवादी ठरवण्यासाठीच होती की काय?, असा उलट सवाल भुजबळ यांनी केला आहे.

यावेळी ते म्हणाले, राज ठाकरे त्यांच्या भाषणात कधी फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही. तसंच लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) समाधी बांधल्याचं जे वक्तव्य केलं ते धादांत खोटं असल्याचंही म्हणाले. ज्या वेळी फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ १३ वर्षांचे होते. टिळकांनी शिवस्मारकासाठी केवळ फंड गोळा केला, मात्र उभ्या आयुष्यात काहीच केलं नाही. पुढे विचारणा झाल्यावर ज्या बँकेत फंड ठेवला होता, ती बँकच बुडाली असं सांगण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही भुजबळांनी केला.

politics
पंतप्रधानांनी मिसळला लहानग्याच्या सुरात सूर; गाण्यावर धरला ताल

दरम्यान, लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली. मग त्यांना ब्राह्मण समजणार का?, त्यांनी पहिलं वर्तमानपत्र काढले, त्याचे नाव मराठा होते असही राज (Raj Thackeray) यांनी कालच्या औरंगाबाद (Aurangabad) येथील सभेत वक्तव्य केलं होतं. तसंच त्यांनी यावेळी शरद पवार जाती-जातींमध्ये भेद करतात, त्यांना हिंदू या शब्दाची अ‍ॅलर्जी आहे. पवार पुस्तक वाचतानाही पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे ते बघतात असा आरोप राज यांनी काल केला होता.

शरद पवारांवर टीका करताना काय म्हणाले राज ठाकरे

शरद पवारांनी कधीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा सभेत उल्लेख केला आहे का? यूट्यूबर त्यांची भाषणे आहेत. ती पाहा. नास्तिक म्हटल्याबरोबर त्यांना लागलं, झोंबलं. देवाचे फोटो वगैरे दाखवले. तुमची कन्याच लोकसभेत बोलल्या की माझे वडील नास्तिक आहेत. मी माझ्या आजोबांचे पुस्तके वाचली आहेत. तुम्ही त्यांची पुस्तक नीट वाचा. संदर्भासहित वाचा, असा दाखला प्रबोधनकार ठाकरे यांचा देत राज यांनी शरद पवारांवर टीका केली. पवार यांना खास करुन त्यांच्यासाठी आजोबांच्या पुस्तकातील संदर्भ आणले आहेत. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढचं करु नका, असंही ते म्हणाले आहेत.

politics
'देवाची चर्चा सोडा, लोकशाहीच्या मंदिरातील ह्या देवाचा श्वास कोंडलाय'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com