
CET Exam : नोंदणीसाठी 11 मे पर्यंत मुदतवाढ
पुणे : तुम्ही अभियांत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्चर अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेची तयारी करत आहात का!, तर मग इकडे लक्ष द्या. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) तंत्रशिक्षण विभागांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याप्रमाणे ‘सीईटी’ परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ मे पर्यत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे, अशी माहिती सीईटी सेलने दिली आहे. (CET Exam Online Application Deadline Extended)
हेही वाचा: 'सर्वज्ञानी संपादक जी' म्हणत चित्रा वाघांचा राऊतांवर निशाणा
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी, एमबीए, एमएमएस सीईटी, एमसीए सीईटी, एम. आर्च सीईटी, एम.एचएमसीटी सीईटी या सामाईक प्रवेश परीक्षांकरिता ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून सीईटी सेलकडे वारंवार होत होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून एक विशेष बाब म्हणून या सीईटी सेलकडून या अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणी करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून या पुढे कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व उमेदवार आणि पालकांनी नोंद घ्यावी, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
Web Title: Cet Exam Online Application Deadline Extended Till May 11
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..