
'सर्वज्ञानी संपादक जी' म्हणत चित्रा वाघांचा राऊतांवर निशाणा
मुंबई : राज्यातील मशिदींवरील भोंग्यावरून वातावरण चांगलेच तापलेले असताना भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. राऊतांनी राज ठाकरे यांना तुम्हाला हिंदुत्त्वाचे धडे देणाऱ्या मास्तरांची डिग्री तपासून घ्या, त्यांची डिग्री बोगस आहे का? ते तुम्हाला चुकीचे धडे देत आहेत असे विधान केले होते. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी या विधानावर राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. (Chitra Wagh Attack On Sanjay Raut)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व भोंगे बंद करा म्हणजे काय? राज ठाकरेंनी डोकं ठिकाणावर ठेवून वक्तव्य करावीत. तुम्हाला हिंदुत्त्वाचे धडे देणाऱ्या मास्तरांची डिग्री तपासून घ्या, त्यांची डिग्री बोगस आहे का? ते तुम्हाला चुकीचे धडे देत आहेत. असे म्हटले होते. त्यावर टीका करताना चित्रा वाघ यांनी म्हटले आहे की, आमच्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचे धडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray ) यांच्याकडून गिरवले आहेत… त्यांची हिंदुत्वाची डिग्री बोगस होती, त्यांनी चुकीचे धडे शिकवले असं तुम्हाला म्हणायचं आहे का? सर्वज्ञानी संपादक जी… असा खोचक टोला चित्रा वाघ लगावला आहे.
हेही वाचा: कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होताच राज ठाकरेंकडून बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्वीट
भाजपने पुन्हा एकदा राज ठाकरेंचा बळी दिला : संजय राऊत
मनसेच्या खांद्यावर बंदुक ठेवून भाजपने हिंदुत्वाचा गळा घोटल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. भोंग्याच्या वादामुळे आज अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये सकाळच्या काकड आरतीला (Kakad Aarti) भाविकांना मुकावे लागल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे अनेक भाविकांची गैरसोय झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मनसेमुळेच (MNS) आज लाखो हिंदू भाविकांची गैरसोय झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मशिदींवरील भोग्यांचं निमित्त करून भाजपने (BJP) हिंदूंचा आणि हिंदुत्त्वाचा गळा घोटल्याचं स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. मनसेमुळेच आज लाखो हिंदू भाविकांची गैरसोय झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे हिंदुत्त्वासाठी आणि भाविकांसाठी आजचा दिवस काळा दिवस असल्याचे ते म्हणाले.
Web Title: Bjp Leader Chitra Wagh Attack On Sanjay Raut Statement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..