
रिना भुतडा - करिअर समुपदेशक
दहावी पूर्ण केल्यानंतर करिअरसाठी शाखा निवडणे हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आयुष्याचा पाया घालणारा महत्त्वाचा निर्णय असतो. योग्य शाखा निवडताना विद्यार्थी व पालकांना येणारे अडथळे आपण आज पाहणार आहोत.
विद्यार्थ्यांना स्वतःच्या आवडीनिवडी, कौशल्य, व्यक्तिमत्त्व किंवा अध्ययन पद्धती याची अनेकदा स्पष्टता नसते.
चुकीचे विषय निवडल्यामुळे ते त्यांच्या कौशल्यांशी किंवा आवडींशी जुळत नाहीत. अशा विषयांचा अभ्यास करताना त्यांना ते कठीण वाटतात.