BHEL मध्ये नोकरीची संधी; 80 हजारापर्यंत मिळेल पगार | BHEL Recruitment 2021 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs

BHEL मध्ये नोकरीची संधी; 80 हजारापर्यंत मिळेल पगार

BHEL Recruitment 2021 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) ने त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमधील कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट ग्रुपमध्ये पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवारांना दिले जाणारे वेतन 80,000 प्रति महिना असेल. कंपनीत 10 पदांसाठी ओपनिंग असून इच्छुक उमेदवार BHEL च्या अधिकृत वेबसाइट careers.bhel.in वर अर्ज करू शकतात. हे अज् ३० नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहेत.

BHEL नोकरीसाठी पात्रता

या नोकरी दरम्यान कामाचे स्वरुप हे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट ग्रुपसाठी नवीन तंत्रज्ञान क्षेत्रातील आवश्यक अभ्यास किंवा संशोधन, प्रगत देशांमधील अलीकडील घडामोडी, धोरण प्लॅन करणे, रोडमॅप आणि अंमलबजावणी यावर इनपुट देण्यात मदत करणे असे असणार आबे

कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट ग्रुपसोबत काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे वय 1 नोव्हेंबर 2021 रोजी 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. याशिवाय, अर्जदारांनी किमान 70% एकूण गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा दोन वर्षांचा व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका असणे आवश्यक आहे.दरम्यान नामांकित संस्थांमधून अभियांत्रिकी पदवीधरांना प्राधान्य दिले जाईल. अर्जदाराला किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे, जो एकतर पीजी पदवी किंवा व्यवस्थापनातील दोन वर्षांचा पीजी डिप्लोमा प्राप्त करण्यापूर्वी किंवा नंतरचा चालू शकतो.

हेही वाचा: पुढच्या आठवड्यात येतेय Hyundai Creta; काय असतील नवीन फीचर्स?

पगार किती मिळेल

कामावर घेतलेल्यांना 80,000 रुपयांचा मासिक पगार दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त, कौटुंबिक मेडिक्लेम कव्हरेजसाठी INR 3500 + GST ​​पर्यंतच्या वार्षिक प्रीमियम परताव्यासाठी हे उमेद्वार पात्र असतील. त्यांना असाइनमेंट यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना काम केलेल्या महिने गुणीले 10,000 ची एकरकमी रक्कम उमेद्वारांना दिली जाईल.

निवड प्रक्रियेमध्ये समितीद्वारे अर्जांची तपासणी केली जाईल त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना परस्पर संवादासाठी बोलावले जाईल. इच्छुक उमेदवारांनी www.careers.bhel.in वर नमूद केलेल्या नोकरीच्या पदासाठी स्वारस्य पत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार या लिंकला येथे भेट देऊ शकतात. https://careers.bhel.in/bhel/static/Advt_YP_CE09_2021.pdf.

कालावधी किती?

ही संधी एक वर्षासाठी देण्यात येत आहे, परंतु तो कालावधी एक वर्षापर्यंत किंवा असाइनमेंट पूर्ण होईपर्यंत (जे आधी असेल) वाढवला जाऊ शकतो. कमाल कार्यकाळ तीन वर्षांपर्यंत मर्यादित असेल.

हेही वाचा: लॉंच झाली देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, पाहा किंमत

loading image
go to top