Maruti Celerio | लॉंच झाली देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, पाहा किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maruti Celerio

लॉंच झाली देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, पाहा किंमत

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित हॅचबॅक मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) लॉन्च केली आहे. अनेकजण खूप दिवसांपासून या गाडीची वाट पाहत होते. कंपनीने या कारला बरेच दिवस अपडेटही केले नव्हते. आता या कारच्या किंमती आणि फीचर्स समोर आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया नवीन सेलेरियोमध्ये काय खास आहे.

Next Gen K10C पेट्रोल इंजिन

नवीन मारुती सेलेरियो ही कंपनीच्या नेक्स्ट-जनरेशन K10C पेट्रोल इंजिनसह येणारी पहिली कार आहे. हे इंजिन भविष्यात मारुती सुझुकीच्या इतर अनेक मॉडेल्समध्येही वापरले जाईल. हे इंजिन 65bhp पॉवर आणि 89Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि AMT सह लॉन्च करण्यात आली आहे. तसेच ही कार 5th HEARTEC तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

देणार अधिक मायलेज

कंपनीने ही कार देशातील सर्वात इंधन किफायतशीर (Fuel Eficient) कार म्हणून लॉन्च केली आहे. कंपनी कारमध्ये वापरण्यात आलेल्या K10C पेट्रोल इंजिनला भारतातील सर्वात इंधन कार्यक्षम इंजिन मानले जात आहे. हे नवीन मॉडेल आउटगोइंग मॉडेलपेक्षा 15 ते 23 टक्के अधिक मायलेज देईल. कंपनीचा दावा आहे की ही कार 26.68kmpl मायलेज देईल. त्यामुळे ही कार देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार ठरते.

हेही वाचा: महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; एका चार्जवर धावेल 140 किमी

सुरक्षा फीचर्स आणि लूक

या कारमध्ये पुश बटण स्टार्ट स्टॉप, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, इलेक्ट्रिकली फोल्डेबल ओआरव्हीएम, ब्लॅक फिनिश 15 इंच अलॉय व्हील यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी या कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, EBD सह ABS, रियर पार्किंग सेन्सर्स आणि स्टँडर्ड किट देण्यात आले आहेत.

किंमत किती आहे?

ही कंपनीची बजेट कार असल्याने कंपनीने तिची किंमत कमी ठेवली आहे. कंपनीने ही कार 4.99 लाख रुपयांपासून सुरु होणाऱ्या किंमतीत लॉन्च केली आहे. त्याच वेळी, या कारच्या टॉप व्हेरियंटची किंमत 6.94 लाख रुपये आहे.

हेही वाचा: गुगलचा नवा नियम आजपासून लागू; सर्वच वापरकर्त्यांसाठी असेल अनिवार्य

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Automobilemaruti suzuki
loading image
go to top