children
sakal
- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
'पार्थला सगळं येत असतं हो, पण लिहीतच नाही परीक्षेत.’ ‘आमची श्रिया ना, खूप छान अक्षर काढते पण इतकी हळूहळू लिहिते ना, की तिचा पेपरच पूर्ण लिहून होत नाही.’ ‘मी तर ना आमच्या अथर्वकडून रोज प्रत्येक भाषेचं हिंदी, मराठी, इंग्लिशमध्ये एक एक पान भरून लिहून घेतो. आता एवढी प्रॅक्टिस केल्यावरही परीक्षेत पेपर लिहून होतच नाही बघा. कितीतरी प्रश्न सोडूनच देतो.’