
अर्जाच्या अटींची पूर्तता करणारे पात्र उमेदवारच भरतीसाठी अर्ज भरू शकतात.
CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती; पगारही मिळणार चांगला
CISF Head Constable Recruitment 2021 : गृह मंत्रालयाच्या DAVP ने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा (CISF) फोर्समध्ये 249 हेड कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना (Notification) जारी केलीय. महिला आणि पुरुष उमेदवार CISF हेड कॉन्स्टेबल जनरल ड्युटीसाठी (GD) अर्ज करू शकतात. CISF भरतीच्या अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी केवळ पात्र खेळाडूंनाच पात्र मानलं जाणार आहे. या CISF हेड कॉन्स्टेबल रिक्त पदावर अर्ज करू इच्छिणारे उमेदवार 31 मार्च 2022 पर्यंत, त्यांचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवू शकतात.
दरम्यान, अर्जाच्या अटींची पूर्तता करणारे पात्र उमेदवारच भरतीसाठी अर्ज भरू शकतात. या पदांकरिता उमेदवाराने 1 सप्टेंबर 2019 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोणत्याही स्पर्धेत भाग घेतलेला असावा. उमेदवाराची पात्रता विजेतेपद किंवा स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर तपासली जाणार आहे. या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवाराला देशाच्या कोणत्याही भागात सेवेसाठी नियुक्त केले जाऊ शकते.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 31 मार्च 2022
रिक्त पदांची संख्या – 249 हेड कॉन्स्टेबल (GD)
CISF हेड कॉन्स्टेबल पगार - पे मॅट्रिक्स लेव्हल-4 (रु. 25,500-81,100)
अर्ज पात्रता : 18 ते 23 वर्षे.
उंची -
पुरुष - 167 सेमी
स्त्री - 153 सेमी
छाती (M)- 81-86 सेमी.
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 12 वी उत्तीर्ण, तसेच राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेला असावा.
अर्ज फी - रु. 100 (महिला आणि SC/ST उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.)