CISF मध्ये 1149 पदांसाठी मोठी भरती; 12 वी विद्यार्थीही करु शकतात अर्ज

CISF Recruitment 2022
CISF Recruitment 2022esakal
Summary

संरक्षण दलात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.

CISF Recruitment 2022 : संरक्षण दलात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. कॉन्स्टेबल पदांसाठी सीआयएसएफनं (CISF Recruitment 2022) नुकतीच भरतीची घोषणा केलीय. याबाबतची जाहिरात सीआयएसएफच्या (CISF Constable /Fireman Vacancy 2022) अधिकृत वेबसाइटवर www.cisfrectt.in प्रसिद्ध करण्यात आलीय. CISF नं कॉन्स्टेबल/फायर (पुरुष) पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली असून 1149 रिक्त जागांसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 29 जानेवारी 2022 रोजी ऑनलाइन पद्धतीनं सुरू करण्यात आली होती.

दरम्यान, सीआयएसएफच्या www.cisfrectt.in या अधिकृत वेबसाइटव्दारे उमेदवार आपला ऑनलाइन अर्ज भरु शकतात. या CISF कॉन्स्टेबल भरतीची अंतिम तारीख 4 मार्च 2022 आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स फायरमन कॉन्स्टेबलच्या (Central Industrial Security Force Fireman Constable Vacancy Notification) रिक्त जागांसाठी आवश्यक तपशील www.cisfrectt.in. या वेबसाइटवर पहावा.

रिक्त जागांचा तपशील

  • पदाचं नाव : कॉन्स्टेबल/फायरमन

  • एकूण पदांची संख्या : 1149

  • अर्ज कसा सबमिट करायचा : फक्त ऑनलाइन

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 मार्च 2022

  • वेबसाइट : www.cisfrectt.in

CISF Recruitment 2022
रेल्वेत 3 हजारांहून अधिक पदांसाठी भरती; 10 वी विद्यार्थीही करु शकतात अर्ज

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा शिक्षण मंडळातून विज्ञान शाखेत 12 वी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : कॉन्स्टेबल पदांसाठी (CISF Constable Bharti) अर्ज करण्याकरता उमेदवाराचं वय ऑनलाइन अर्ज मिळाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार (म्हणजे 4/3/2022) 18-23 वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म 5/3/1999 पूर्वी झालेला नसावा आणि 4/3/2004 नंतरही झालेला नसावा.

SC/ST : 5 वर्षे

ओबीसी : 3 वर्षे

माजी सैनिक : 3 वर्षे

UR : 5 वर्षे

OBC : 8 वर्षे

SC/ST : 10 वर्षे

अर्ज फी : सामान्य / OBC / EWS श्रेणीतील अर्जदारांना अर्ज करण्यासाठी 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर SC / ST ESM श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलीय. याबाबतच्या अधिक माहितीसाठी CISF च्या अधिकृत वेबसाइटला www.cisfrectt.in. भेट द्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com