

The Crucial Phase of Class 12 Students
Sakal
रीना भुतडा ( करिअर समुपदेशक)
नवी क्षितिजे
बारावीच्या सर्व परीक्षा जवळ येऊ लागल्या की विद्यार्थी आणि पालक दोघांच्या मनात ताण, प्रश्न आणि अनिश्चिततेचे ढग दाटू लागतात. अभ्यासाचे ओझे, वेळेचे नियोजन, स्पर्धेचा वाढता दबाव, मित्रांच्या तुलनेचे पडसाद आणि भविष्यातील चिंतेचे सावट, यामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक क्षमतेची खरी कसोटी लागते. आत्मविश्वास बळकट करून सामोरे जाण्याचा, मन स्थिर ठेवण्याचा व योग्य दिशेचा शोध घेण्याचा हाच काळ असतो.