

scholarship exam
sakal
पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा २१ फेब्रुवारी २०२७ रोजी होणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांचे अर्ज ३० नोव्हेंबरपर्यंत भरता येणार आहेत.