
सर्वसाधारणपणे ज्या ज्या व्यक्तींनी आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवले, त्या सगळ्यांमधे काही सामायिक व्यवच्छेदक लक्षणे दिसतात. पहिली म्हणजे सरासरीपेक्षा जास्त सर्वसाधारण बौद्धिक क्षमता. सर्वसामान्यांपेक्षा अधिक ! म्हणजेच ती अत्यंत उच्च क्षमतेची आहेच असे नाही. मात्र त्यांनी निवडलेल्या क्षेत्रासाठी बऱ्यापैकी उत्तमाकडे जाणारी!