सेंट्रिंग कामगाराच्या मुलानं स्पर्धा परीक्षेत मारली बाजी; चटके सोसत अक्षय पाखरे बनला विक्रीकर अधिकारी

अक्षयने शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याचा अभ्यास सुरू होता.
Competitive Exam Akshay Pakhare Sales Tax Officer
Competitive Exam Akshay Pakhare Sales Tax Officeresakal
Summary

शासकीय सेवेत एवढ्या मोठ्या पदावर जाणारी समाजातील पहिलीच व्यक्ती असल्याने अखंड समाज एकत्र आला. त्यांची मिरवणूक गावातून काढण्यात आली.

विसापूर : येथील सेंट्रिंग कामगारांच्या (Centering Workers) मुलांने स्पर्धा परीक्षेत (Competitive Exam) बाजी मारली. चटके सोसत तो विक्री कर अधिकारी (Sales Tax Officer) बनला आहे. याचबरोबर मागासवर्गीय समाजात तो राज्यात तिसरा आला आहे. अक्षय परशुराम पाखरे असे या युवकाचे नाव आहे. त्याच्या निवडीनंतर मित्रासह समाजातील युवकांनी गावातून मिरवणूक काढली.

येथील परशुराम पाखरे हे सेंट्रिंगचे काम करतात. अक्षयने शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याचा अभ्यास सुरू होता. पॉलिटिकल सायन्स विषय घेऊन तो पदवीधर झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा जिंकण्याचा त्याचा मानस होता. त्यासाठी त्याची धडपड चांगलीच होती. मात्र, परिस्थितीचे चटके आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे त्याला माघार घ्यावी लागली.

Competitive Exam Akshay Pakhare Sales Tax Officer
Kolhapur Loksabha : तब्बल 25 वर्षांनंतर कोल्हापुरात दिसणार 'हात'; शाहू महाराजांच्या उमेदवारीने मिळाली प्रतिष्ठा

मात्र, यामध्ये खचून न जाता पुन्हा त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर अधिकारी, दुय्यम निबंधक या परीक्षांचा त्यांनी अभ्यास सुरू केला. नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा झाली. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला. त्यांची विक्रीकर अधिकारी या पदावर नियुक्ती झाली. तसेच मागासवर्गीय समाजात राज्यात ते तिसरे आले. ही माहिती समजताच गावातील त्यांचे मित्र तसेच चर्मकार बांधवांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

Competitive Exam Akshay Pakhare Sales Tax Officer
साताऱ्यासाठी शरद पवारांचा 'गेम प्लॅन'; महायुतीच्या उमेदवारावर ठरणार पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार, सस्पेन्स वाढला

शासकीय सेवेत एवढ्या मोठ्या पदावर जाणारी समाजातील पहिलीच व्यक्ती असल्याने अखंड समाज एकत्र आला. त्यांची मिरवणूक गावातून काढण्यात आली. येथील विसापूर ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक सुनील पाटील व अध्यक्ष विठ्ठल मोरे तसेच सद्‍गुरू शामराव महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष संस्थापक अर्जुन पाटील यांच्या हस्ते अक्षय पाखरे यांचा सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com