महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 'आरआयएमसी' प्रवेश पात्रता परिक्षाचे आयोजन

अक्षता पवार
Thursday, 6 August 2020

- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी 'आरआयएमसी' प्रवेश पात्रता परिक्षाचे आयोजन
-  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पुण्यात होणार परीक्षा
- डेहराडून येथील राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयात इयत्ता 8वीसाठीची प्रवेश परीक्षा

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी डेहराडून येथील 'राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालयात' (आरआयएमसी) इयत्ता आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठी असून ती डिसेंबर 1 ते 2 दरम्यान पुण्यात होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या विद्यार्थ्यांचे वय 1 जुलै 2021ला अकरा वर्ष सहा महिने पेक्षा कमी व तेरा वर्षांपेक्षा जास्त नाही असे विद्यार्थी या परीक्षेस पात्र असतील. तसेच विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 7वी मध्ये शिकत असावी किंवा 7वी उत्तीर्ण झाले असावे.

Video : मान-प्रसिद्धी देऊ शकत नाही दोनवेळची भाकर; कलाकारांवर आली बोंबिल-सुकट विकण्याची वेळ!

दरम्यान, ''या पात्रता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आरआयएमसीकडून आवेदनपत्र घ्यावे लागणार असून हे आवेदन पत्र भरून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना 30 सप्टेंबर पर्यंत पाठवणे अनिवार्य आहे तर, आवेदनपत्रासाठी विद्यार्थ्यांनी www.rimc.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच या संबंधित लागणारे कागदपत्र किंवा इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांना 020-26123066/67 या क्रमांकावर अथवा www.mscepune.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल.'', अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांनी पत्रा द्वारे केले आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conducting RIMC Entrance Eligibility Test for Students in Maharashtra