Ratnagiri : तब्बल 700 शिक्षकांच्या बदल्या, दोन हजार पदं रिक्त; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा होणार बट्ट्याबोळ

शून्य शिक्षकी अनेक शाळा झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार आहे.
Teacher
TeacherSakal
Summary

याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांची लवकरच आपण भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजापूर : मोठ्या संख्येने सेवानिवृत्त झालेले शिक्षक, त्याच्या जोडीला सातशेहून अधिक शिक्षकांच्या झालेल्या जिल्हा बदल्या आणि दुसऱ्या बाजूला रखडलेली शिक्षक भरती (Teacher Recruitment) यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची सुमारे दोन हजार म्हणजे एकूण संख्येच्या २५ टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत.

शून्य शिक्षकी अनेक शाळा झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ होणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना शिक्षकांच्या जिल्हा बदल्या करताना दहा टक्क्यांपेक्षा कमी पदे रिक्त ठेवता येत नाहीत, या नियमावलीचा अन् शून्य शिक्षकी शाळा होत असल्याचा विसर पडला की काय, असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर तोफ डागली आहे.

Teacher
Cyclone Biparjoy Alert : चक्रीवादळात स्वतःला कसं सुरक्षित ठेवाल? जाणून घ्या काही उपाय

रिक्त असलेली शिक्षक पदे भरण्याबाबत योग्य तो निर्णय वा तोडगा तातडीने काढला जावा, सर्व शाळांमध्ये तातडीने शिक्षक नियुक्ती व्हावी अन्यथा भविष्यामध्ये शिक्षक मागणीसाठी शाळा बंद आंदोलन झाल्यास वा पालक-विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. जोपर्यंत शिक्षक भरती होत नाही तोपर्यंत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या ठिकाणी जिल्ह्यातील डीएड्, बीएड्धारकांना (D.Ed., B.Ed) शिक्षक म्हणून नियुक्ती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Teacher
Cyclone Biparjoy Alert : कोकण किनारपट्टीवर 'या' कारणामुळं मोठ्या लाटा; तज्ज्ञांकडून महत्वाची अपडेट समोर

दरम्यान, याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांची लवकरच आपण भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता अनेक शिक्षक सेवानिवृत्त झालेले असताना दुसऱ्‍या बाजूला यावर्षी जिल्ह्यातील सुमारे ७०० शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या आहेत. सुमारे दोन हजार शिक्षकांची पदे रिक्त झाली असून, अनेक शाळा शून्य शिक्षकी झाल्या आहेत.

Teacher
'या' राज्यात काँग्रेसच्या अडचणी वाढल्या; राहुल गांधींसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कोर्टाचं समन्स

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा शिक्षकांअभावी बट्ट्याबोळ होणार असल्याकडे नागले यांनी लक्ष वेधले आहे. जिल्ह्यातील २५ टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षक पदे रिक्त राहताना ७०० शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या कशा? असा सवाल करत नागले यांनी प्रशासनाने जिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवल्याने शून्य शिक्षकी शाळांची संख्या वाढल्याचा ठपका ठेवला.

Teacher
ED Inquiry : NCP आमदार हसन मुश्रीफांसह त्यांच्या मुलासमोरील अडचणी वाढल्या; कोर्टानं दिला 'हा' आदेश

नोकरीचा प्रश्‍न सुटेल

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक नियुक्तीला पात्र ठरणारे डीएड्, बीएड्धारक विद्यार्थी आहे. शिक्षक भरती रखडल्याने त्यांच्या रोजगार वा नोकरीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा स्थितीमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जागेवर जिल्ह्यातील डीएड्, बीएड्धारक विद्यार्थ्यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी नागले यांनी केली आहे. या नियुक्तीतून शून्य शिक्षकी शाळांचा आणि डीएड्, बीएड्धारकांच्या नोकरीचा प्रश्‍न सुटेल, असे नागले सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com