कोरोनामुळे बदलतंय कार्पोरेट कल्चर... आता ऑफीस येणार घरात

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

ट्विटर, एडोब, फेसबुक, डेल, फ्लिपकार्ट, तसेच पुण्यातील एसएपी कंपनीनेही कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितलं आहे. भलेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असा आदेश काढला असला तरी त्यातून काही फायदेही कंपनीला होणार आहेत.

नगर ः कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अर्थव्यवस्थेलाही त्याने नख लावला आहे. हे संकट परतून लावण्यासाठी डब्ल्यूएचओसह सगळेच देश प्रयत्नशील आहेत. मात्र, या संकटाने जीवनशैलीच बदलून जाण्याची शक्यता आहे. कार्पोरेट कल्चरवर याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे.

ट्विटर, एडोब, फेसबुक, डेल, फ्लिपकार्ट, तसेच पुण्यातील एसएपी कंपनीनेही कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितलं आहे. भलेही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असा आदेश काढला असला तरी त्यातून काही फायदेही कंपनीला होणार आहेत.

दुसरीकडे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सवय आहे का आणि कंपन्यांचीही मानसिकता आहे का, हाही मुद्दा समोर आला आहे.

तिकडे अमेरिकेत नासाच्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची क्षमता तपासली जाते आहे. भारतात कंपन्यांनी ट्रॅव्हल्सला प्रतिबंध केलेला आहे.

महाराष्ट्र सरकारने कंपन्यांमध्ये येण्याऐवजी घरूनच कर्मचाऱ्यांना काम करायला लावण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांच्याकडे अशी सुविधा नाही, त्यांना आपले काम बंद ठेवावे लागणार आहे. त्यातून संबंधित कामगार आणि कंपन्यांचेही नुकसान होणार आहे.

एका मीडिया हाऊसचे प्रमुखाने सांगितले आहे की, जगभरातील आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. त्यासाठीची सुविधाही आम्ही त्यांना पुरवली आहे. आमच्याकडे कोरोनाचा एकही पेशंट नाही तरीही आम्ही कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा आदेश दिला आहे.

कार्यक्षमता वाढते

घरात बसून काम ही संकल्पना भारतात नवी आहे. कर्मचारी घरातून आपले काम व्यवस्थित करतील की नाही, याची साशंकता कंपनीला आहे. मात्र, द कन्वर्सेशन एका रिपोर्टनुसार असे सांगते की प्रोडक्टिव्हीटी वाढते. कर्मचारी आणि सुपरवायझर यांचीही कार्यक्षमता वाढल्याचे समोर आलं आहे. एकंदरीत १३ टक्के त्यांची क्षमता वाढली आहे.

घरातून काम करण्याचे फायदे?

सर्वाधिक उपाययोजना केल्या तरच आपण कोरोनापासून बचाव करू शकतो. त्यामुळेच घरातून काम करण्याचा उपाय एकदम बेस्ट आहे.लोकांमध्ये गेलंच नाही तर बचाव चांगल्या प्रकारे होऊ शकेल.

हे फायदे होतील...

वेळेतील लवचिकपणा. कामाचे ठराविक तासांचे बंधन नाही, ना लंच टाईम ना टी टाईम. गर्दीतून वाट काढत अॉफिस गाठायचीही झंझट नाही. स्वच्छता सर्वोत्तम.. त्यामुळे दुसऱ्याचा घाणेरडापणा आपल्याला झेलावा लागणार नाही. संसर्गजन्य आजारापासून लांब राहता येईल. गर्दीचाही त्रास होणार नाही. आपल्याला हवे तसे कपडे आपण घरी घालू शकतो. आपण हवी तेव्हा सुटी घेऊ शकतो. तुम्हाला अॉफिसचे कोणतेही बंधन नाही

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus changing corporate culture