esakal | आजपासून सीएस परीक्षा केंद्रात करा बदल; 'आयसीएसआय'ची अधिसूचना जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

CS Exams

भारतीय कंपनी सचिव संस्थानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली असून जून 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या तारखांत बदल करण्याचा निर्णय घेतलाय.

आजपासून सीएस परीक्षा केंद्रात करा बदल; 'आयसीएसआय'ची अधिसूचना जाहीर

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

CS Exams 2021 : भारतीय कंपनीने (आयसीएसआय) (Institute of Company Secretaries of India) सोमवारी जाहीर केलेल्या फाऊंडेशन (foundation), एक्झिक्युटिव्ह (executive) आणि प्रोफेशनल कोर्स परीक्षांच्या (professional examination) तारखांत कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर बदला करण्याचा निर्णय घेतलाय. आता 10 ते 20 ऑगस्ट 2021 या कालावधीत प्रस्तावित सीएस परीक्षांसाठी परीक्षा केंद्र बदलण्याचा पर्याय झाला असल्याचे समजते. बुधवारी 9 जून रोजी याबाबत अधिसूचना जारी झाली होती. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरत असताना निवडलेल्या परीक्षा केंद्रात दुरुस्ती करायची असेल, तर त्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला icsi.edu भेट द्यावी. तद्नंतर smash.icsi.in या वेबसाइटवर जाऊन लॉगइन करावे व आपण स्वत: साठी नवीन परीक्षा केंद्र (शहर) निवडावे. सीएस परीक्षा शहर (केंद्र) बदलण्यासाठी 12 जून रोजी रात्री 11.59 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. (cs exams 2021 icsi provides opt out facility extra attempt and opens application correction window to change exam center from today for foundation executive and professional examinations)

विद्यार्थ्यांना 'ऑप्ट-आउट'चा पर्याय

भारतीय कंपनी सचिव संस्थानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली असून जून 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या तारखांत बदल करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, फाउंडेशन, एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना 'ऑप्ट-आउट' हा पर्याय देण्यात आला आहे. आयसीएसआयने 1 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत 'ऑप्ट-आउट'साठी अप्लीकेशन विंडो देखील खुली ठेवण्याची घोषणा केलीय.

हेही वाचा: बंजी जम्पिंगची आवड आहे? मग, या 5 साहसी ठिकाणांना जरुर एकदा भेट द्या..

'एक्स्ट्रा अटेम्प्ट'

या व्यतिरिक्त आयसीएसआयने डिसेंबर 2021 च्या सत्रातील परीक्षांसाठी एक्झिक्युटिव्ह व प्रोफेशनल कोर्सेसच्या जुन्या व नवीन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीही 'एक्स्ट्रा अटेम्प्ट' जाहीर केला. या दोन्ही अभ्यासक्रमांचे विद्यार्थी ज्यांची जून 2021 च्या सत्रात परीक्षा होऊ शकली नाही, त्यांना डिसेंबरच्या सत्र परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.

cs exams 2021 icsi provides opt out facility extra attempt and opens application correction window to change exam center from today for foundation executive and professional examinations