CUET Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CUET Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

CUET Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा निकाल आज जाहीर होणार आहे. UGC चे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी आज (15 सप्टेंबर 2022) रात्री 10 वाजता निकाल जाहीर करणार आहे. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक असेल. ही माहिती त्यांच्या प्रवेशपत्रावर उपलब्ध आहे.

या परीक्षेला सुमारे 15 लाख विद्यार्थी बसले होते. जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज रात्री जाहीर होणार आहे. या परीक्षेद्वारे देशातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी डीयू, जामिया, जेएनयू आणि इतर केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

CUET परीक्षा ही 15 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आली होती. CUET UG देशभरातील 259 शहरांमध्ये आणि परदेशातील 10 शहरांमध्ये स्थापन केलेल्या 489 केंद्रांवर घेण्यात आली होती. एकूण 6 टप्प्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. तुम्ही cuet.samarth.ac.in या वेबसाईट वरती निकाल पाहू शकता.

Web Title: Cuet Ug Results Will Be Announced By National Testing Agency By Around 1000 Pm Tonight

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :examResult