podcast
sakal
- शार्दुल कदम, सहसंस्थापक - ‘अमुक तमुक’ पॉडकास्ट
सध्याचा काळ डिजिटल माध्यमांचा आणि त्यातही ‘पॉडकास्ट’चा असल्याचं म्हटलं जातं. दोन किंवा त्याहून अधिक जणांनी एकत्र येऊन एखाद्या विषयावर मारलेल्या गप्पा किंवा तज्ज्ञांच्या मुलाखती पाहायला-ऐकायला सगळ्यांना आवडतं. त्यातही ‘यंगस्टर्स’ची संख्या जास्त असते. लाइक, कमेंट, व्ह्यूजच्या या खेळात आपण श्रोत्यांना काय देत आहोत? काय दाखवत आहोत? आणि त्याचे परिणाम काय होतील? याबाबत सतत सजग असतो, तोच या आभासी विश्वाच्या पलीकडे असलेल्या माणसांपर्यंत पोहोचतो!