
केंद्र सरकारने नव्यानेच जाहीर केलेल्या योजनेनुसार भारतीय हवाईदलात ‘अग्निवीर’ योजनेंतर्गत नेमणूक करण्यासाठी नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविले येत आहेत.
वेध करिअरचा : वायुदलात ‘अग्निवीर’ म्हणून संधी
केंद्र सरकारने नव्यानेच जाहीर केलेल्या योजनेनुसार भारतीय हवाईदलात ‘अग्निवीर’ योजनेंतर्गत नेमणूक करण्यासाठी नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविले येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
अर्जदारांनी खालील शैक्षणिक पात्रतेपैकी कोणतीही एक पूर्ण केलेली असावी -
१० + २ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व इंग्रजी या विषयांसह पूर्ण केलेली असावी व त्यांच्या गुणांची टक्केवारी ५० असावी.
इंजिनिअरिंगमधील तीन वर्षीय पदविका अभ्यासक्रम इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांच्या गुणांची टक्केवारी किमान ५० असावी.
शालान्त परीक्षेनंतर दोन वर्षांचा कौशल्य विकास विषयक अभ्यासक्रम भौतिकशास्त्र, गणित व इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण केलेला असावा. व त्यांच्या गुणांची टक्केवारी ५० असावी.
विज्ञान विषयांशिवाय अन्य विषयातील उमेदवारांनी बारावीची परीक्षा इंग्रजी विषय घेऊन व कमीतकमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड प्रक्रिया
अर्जदारांची निवड चाचणी २४ जुलै २०२२ पासून निर्धारित कालावधीत संगणकीय पद्धतीने घेण्यात येईल. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्यांना हवाईदलातर्फे पुढील निवड चाचणी व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलविण्यात येऊन त्या आधारे उमेदवारांची हवाईदलात ‘अग्निवीर’ म्हणून निवड करण्यात येईल.
वयोमर्यादा - अर्जदारांचा जन्म २९ डिसेंबर १९९९ ते २९ जून २००५च्या दरम्यान झालेला असावा.
अर्जासह भरावयाचे शुल्क - प्रवेश परीक्षा शुल्क म्हणून अर्जासह २५० रुपये भरणे आवश्यक आहे.
नेमणुकीचा कालावधी व वेतन - अग्निवीर योजनेतंर्गत हवाईदलात निवड झालेल्या उमेदवारांच्या नेमुणकीचा कालावधी साडेचार वर्ष असेल.
त्या दरम्यान अग्निवीरांना त्यांच्या नेमणुकीच्या पहिल्या वर्षी वार्षिक ४.७६ लाख रुपये एकत्रित वेतन मिळेल. वार्षिक वेतनाची राशी प्रशिक्षकाच्या चौथ्या वर्षी वार्षिक वेतनाची देय रक्कम ६.९२ लाख रुपये असेल.
वेतनाशिवाय अग्निवीरांना त्यांच्या प्रशिक्षणकाळात नियमांनुसार अन्य फायदे मिळतील.
सेवानिधी - अग्नीवीर त्यांच्या प्रशिक्षण काळात त्यांना मिळणाऱ्या वेतनापैकी ३० टक्के रक्कम सेवा निधी म्हणून देतील. सरकारतर्फे तेवढीच राशी देण्यात येईल. अशाप्रकारे एकत्रित होणारी ११.७१ लाख रुपयांची राशी त्यांना प्रशिक्षण समाप्तीच्यावेळी देण्यात येईल. ही राशी करमुक्त स्वरूपात असेल.
अधिक माहिती व तपशील - या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी हवाईदलाच्या https://indianairforce.nic.in अथवा https://careerindianairforce.cdac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व अंतिम मुदत - संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची अंतिम मुदत ५ जुलै २०२२ आहे.
Web Title: Dattatrey Aambulkar Writes Career Air Force Agniveer Scheme Opportunity Education Job
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..