पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत राज्यातील १० लाख ८५ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. दरम्यान, अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीसाठी येत्या गुरुवारपर्यंत (ता. ५) मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे.