

Decision-Making in Career: Staying Committed
Sakal
डॉ. सचिन जैन ( संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड )
कौशल्य विकसन
बहिणाबाई चौधरी म्हणजे बोली भाषेतल्या प्रसिद्ध कवयित्री. त्यांची एक सुंदर रचना आहे, जनी म्हणे तेच खरे, जमान्याचे सोड बाबा, घोड्यावर बसलेल्या बी हासते अन् पायी चालणाऱ्येली भी हासते. अतिशय मार्मिक ‘लेवा गणबोली’ भाषेत लिहिलेले, परंतु किती लाख मोलाची शिकवण देऊन जाते. आपण एखादा निर्णय घेतला तर, त्यावर ठामपणे उभे राहायला पाहिजे, उगाच कोण काय म्हणेल किंवा कुणी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करून सल्ला दिला तर लगेच निर्णय बदलू नये.