

The Emotional Nature of Human Decisions
sakal
डॉ. सचिन जैन (संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड)
कौशल्य विकसन
माणूस भावनाप्रधान प्राणी आहे. कितीही म्हटले तरी सगळे निर्णय फक्त मेंदूने, भावनेच्या आहारी न जाता घेता येत नाहीत. व्यवहारिक जीवनात, विशेषतः आपण व्यावसायिक भविष्याची दिशा ठरवीत असतो ते वय, भोवतालचे वातावरण, नवनवीन महत्वाकांक्षा, नवी नाती, ऋणानुबंध अशी बरीच गणिते आपल्या निर्णयाचा भाग बनतात. अशावेळी मनाचा, व्यावहारिकतेचा, आणि परिस्थितीचा समतोल साधत आपल्या भविष्याची दिशा ठरवली जाऊ लागते.