- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
मागील भागात आपण ज्ञान निर्मितीची ‘वैज्ञानिक पद्धती’ याबद्दल जाणून घेतलं. ही पद्धती फक्त वैज्ञानिकांसाठी आहे असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. वास्तविक या ‘वैज्ञानिक पद्धतीचा’ विवेकनिष्ठ वर्तन, निर्णयप्रक्रिया तसेच व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारं भावना हाताळण्याचं कौशल्य; यांच्याशी सुद्धा अतूट संबंध आहे.