- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
जागतिकीकरणाच्या आणि आर्थिक स्पर्धेच्या युगात वित्तीय क्षेत्रात करिअर करण्याची संधी तरुणांना आकर्षित करते. लेखापरीक्षण, करसल्ला, वित्तीय विश्लेषण आणि गुंतवणूक व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये दोन महत्त्वाच्या व्यावसायिक पदवी चर्चेत असतात – चार्टर्ड अकाउंटंट (सीए) आणि चार्टर्ड फायनान्शिअल अॅनालिस्ट (सीएफए). दोन्ही पदव्यांमुळे करिअरच्या उत्तम संधी मिळतात, मात्र अभ्यासक्रम, स्वरूप आणि कार्यक्षेत्र यात दोघांमध्ये फरक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यापैकी एक निवडताना आपल्या आवडी, कौशल्ये आणि ध्येय लक्षात घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते.