‘डिजिटल मार्केटिंग’ चा नवा मार्ग!

व्यक्तिगत कौशल्य आणि डिजिटल बाबींचे ज्ञान याला सर्वांत जास्त महत्त्व
Digital marketing promotion or sale product through internet online systems
Digital marketing promotion or sale product through internet online systemssakal

‘डिजिटल’ काळाबरोबर करिअरचे मार्ग आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता यात कमालीचा बदल झाला आहे. पारंपारिक शिक्षण पद्धतीत घेतल्या जाणाऱ्या कागदी डिग्र्यांपेक्षा आता व्यक्तिगत कौशल्य आणि डिजिटल बाबींचे ज्ञान याला सर्वांत जास्त महत्त्व आले आहे. सगळे जग आता डिजिटली फिरत असल्याने आता डिजिटल मार्केटिंग हा संपूर्ण जागतिक बाजारपेठेचा कणा झाला आहे.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट किंवा विविध ऑनलाइन प्रणालींच्या साहाय्याने आपल्या उत्पादनाची किंवा सेवेची जाहिरात वा विक्री करणे. यासाठी अद्ययावत डिजिटल तंत्रज्ञान तसेच मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप आदी इंटरनेटशी जोडल्या जाऊ शकणाऱ्या विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर केला जातो. काळाबरोबर बदलत जाणाऱ्या या ट्रेण्डला सामावून घेताना आता कुशल ‘डिजिटल मार्केटर’ना कॉर्पोरेट क्षेत्रात व इतरही बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे.

डिजिटल मार्केटर होण्यासाठी वयाची अट अजिबात नाही; गरज आहे ती फक्त या क्षेत्रातले ज्ञान घेण्याची! या क्षेत्रात करिअर करताना वयाची आणि शिक्षणाची अट नसल्याने डिजिटल मार्केटिंगच्या शिक्षणाची सुरुवात केव्हाही करता येते. वयाच्या विशीत, तिशीत, चाळिशीत किंवा अगदी जेव्हा या क्षेत्रात करिअर करायची इच्छा असेल तेव्हा या क्षेत्रातील करिअरला सुरुवात करता येते. यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मस्ची गरज असल्याने जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आपण या क्षेत्रातील शिक्षण घेऊ शकतो; तसेच या क्षेत्रात कामही करू शकतो.

जागतिक पातळीवरही प्रचंड डिमांडमध्ये असलेल्या या क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी केवळ या क्षेत्राशी समरस होऊन या क्षेत्रातील संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेकांनी करिअरच्या सुरुवातीला तसेच करियरच्या मधल्या टप्प्यावर ‘डिजिटल मार्केटिंग’ची निवड केली आणि नवीन जगाच्या नवीन कार्यक्षेत्रात यशस्वीपणे भरारी घेतली आहे.

थोडा काळाच्या पुढचा विचार करून, ‘आपणही याच क्षेत्रात करिअर करायला हवे का?’ याचा विचार अंतर्मुख होऊन प्रत्येकाने करायला हवा! आणि या क्षेत्रातील कामाची आवड असल्यास विनाविलंब ‘डिजिटल मार्केटिंग’चे तंत्र शिकून घ्यावे!

अधिक माहितीसाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा.
अधिक माहितीसाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com