डिजिटल स्किल - डेटा व्हर्च्युअलायझेशन

डेटा व्हर्च्युअलायझेशन हे वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे.
Digital
Digital Sakal
Updated on

- प्रा. डॉ. दीपक ताटपुजे

डेटा व्हर्च्युअलायझेशन (आभासीकरण) हे वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. त्यामध्ये विविध संसाधनांमधून डेटा पुनर्प्राप्ती करण्याची प्रक्रिया असते. ही प्रक्रिया अनेक संसाधनांमधून विविध डेटा संकलित करते आणि ‘डेटा वापरकर्त्यांना’ त्यांच्या कामाच्या आवश्यकतांनुसार या डेटासेटमध्ये प्रवेश करण्यास (अॅक्सेस) परवानगी देते.

डेटा व्हर्च्युअलायझेशन हे एक अत्याधुनिक डेटा सेंटर तयार करते, ते अत्यंत परिवर्तनीय, उपलब्ध होणारे आणि सुरक्षित आहे. व्हर्च्युअलायझेशन हे ‘व्हर्च्युअलायझेशन आणि क्लाउड कॉम्प्युटिंग’ तंत्रज्ञानावर डेटा सेंटर डिझाइनसह विकसित आणि उपलब्ध करण्याचेही तंत्रज्ञान आहे. क्लाउड स्टोरेज हे कॉम्प्युटिंग प्रदात्याद्वारे इंटरनेटवर डेटा एकत्रित करते जे सेवा म्हणून डेटा साठवून व्यवस्थापन आणि संचलितही करते.

सेंटरमधील सर्व्हर आणि उपकरणे करत असलेल्या कृती करणे आणि त्यांचे भौतिक स्वरूप काढून घेण्यासाठी ‘व्हर्च्युअलायझेशन आर्किटेक्चर’ हे एक वैचारिक मॉडेल कार्यरत आहे. ते यात समाविष्ट असलेल्या विशिष्ट घटकांची व्यवस्था आणि परस्पर संबंध स्पष्ट करत असल्याने अत्यंत उपयोगी आहे. डेटा व्हर्च्युअलायझेशन या सॉफ्टवेअरद्वारे तुमच्या हार्डवेअरला एक किंवा अधिक मशिनमध्ये आभासी करते तर क्लाउड कॉम्प्युटिंग हे एक किंवा अधिक मशिनमध्ये हार्डवेअर उपकरणांचे संयोजन करते. रिमोट, वन-टू-वन डेटा व्हर्च्युअलायझेशन हे ऑफ-साइट सर्व्हरवर ॲप्लिकेशन वातावरण पुन्हा तयार करण्यासाठी सक्षम आहे. क्लाउड कॉम्प्युटिंग व अन्य प्रक्रियांद्वारे सर्व्हर व्हर्च्युअलायझेशन, अॅप्लिकेशन व्हर्च्युअलायझेशन, नेटवर्क व्हर्च्युअलायझेशन, डेस्कटॉप व्हर्च्युअलायझेशन, स्टोरेज व्हर्च्युअलायझेशन, आदी व्हर्च्युअलायझेशनचे प्रकारांमध्ये कार्य करते त्यामुळे या क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे.

मायक्रोसॉफ्ट व्हर्च्युअल पीसी, ओरॅकल व्हर्च्युअल बॉक्स, व्हीएमवेअर वर्कस्टेशन, ओरॅकल सोलारिस झोन, व्हीएमवेअर फ्यूजन, एक्स८६साठी ओरॅकल व्हीएम सर्व्हर आदींचा समावेश होतो. व्हीएमवेअर फ्यूजन, पॅरलल्स डेस्कटॉप, ओरॅकल व्हीएम व्हर्च्युअल बॉक्स, व्हीएमवेअर वर्कस्टेशन आदी अनेक सॉफ्टवेअर व्हर्च्युअलायझेशनच्या विविध कार्यासाठी उपलब्ध आहेत.

ॲक्टिफियो व्हर्चुअल डेटा पाइपलाइन, अटस्केल इंटेलिजेंट डेटा व्हर्चुअलाइजेशन, एसएएस फेडरेशन सर्व्हर, सीडीटा ड्राइवर टेक्नोलॉजीज, डाटामीर स्पॉटलाइट, डेनोडो प्लॅटफॉर्म, टिब्को, आईबीएम क्लाउड पार्क, ओरेकल डेटा सर्व्हिस इंटिग्रेटर, रेड हैट जेबॉस डेटा व्हर्चुअलाइजेशन, एसएपीएनए व्हर्चुअलाइजेशन आदी अनेक सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म उपलब्ध असलेल्या कौशल्य धारकांची आवश्यकता सातत्याने या क्षेत्रात वाढते आहे.

होस्ट मशिन हे भौतिक हार्डवेअर असून त्यावर आभासीकरण होते. व्हर्च्युअल मशिन (आभासी) केवळ सॉफ्टवेअर मशिन तयार केलेल्या आभासी वातावरणात होस्ट मशिनवर चालते. क्लाउड संगणन आणि आभासीकरण, बॅकअपची चिंता नाही, कूलिंग सिस्टम नाही, जलद बदली, चांगली परिवर्तनीयता, उत्तम चाचणी, उत्तम आपत्ती पुनर्प्राप्ती हे डेटा व्हर्च्युअलायझेशनचे अनेक फायदे आहेत यामुळे या क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com