esakal | Jobs : अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी थेट भरती! "या' तारखेपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी थेट भरती!

अणुऊर्जा विभागात शासकीय नोकऱ्या शोधणाऱ्या इच्छुकांसाठी मोठी बातमी.

अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी थेट भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

अणुऊर्जा विभागात शासकीय नोकऱ्या (Government Jobs) शोधणाऱ्या इच्छुकांसाठी मोठी बातमी. अणू खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय (Directorate of Atomic Mineral Exploration and Research), भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाने (Department of Atomic Energy) गट B आणि गट C पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 10 ऑक्‍टोबर 2021 रोजी संचालनालयाने जारी केलेली भरती जाहिरात क्र. AMD-3/2021 नुसार सायंटिफिक सायंटिस्ट, तंत्रज्ञ, उच्च विभाग लिपिक (UDC), ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) आणि सुरक्षा रक्षक अशा एकूण 124 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 ऑक्‍टोबर 2021 निश्‍चित करण्यात आली आहे.

हेही वाचा: भारतीय लष्करात टेक्‍निकल एंट्री स्कीम! अर्ज प्रक्रियेला सुरवात

असा करा अर्ज

खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालयात (AMD) भरतीसाठी इच्छुक उमेदवार संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइट amd.gov.in वर उपलब्ध ऑनलाइन फॉर्म भरून अर्ज करू शकतात. वेबसाइटला भेट दिल्यानंतर उमेदवारांना अपडेट्‌स विभागात जावे लागेल. तिथे तुम्हाला संबंधित भरतीच्या लिंकवर क्‍लिक करावे लागेल. त्यानंतर नवीन पेजवर हिंदी किंवा इंग्रजीतील जाहिरातीच्या लिंकवर क्‍लिक करा. ऑनलाइन अर्जाच्या पेजची लिंक भरती जाहिरातीतच दिली आहे. तथापि, भरती जाहिरात आणि अर्जाच्या पेजची लिंक देखील त्याखाली दिली आहे.

जाणून घ्या पात्रता

  • सायंटिफिक सायंटिस्ट : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा किमान 60 टक्के गुणांसह रिक्त पदांशी संबंधित विषयांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर.

  • तंत्रज्ञ बी : मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 60 टक्के गुणांसह एसएससी आणि संबंधित ट्रेडमध्ये किमान एक वर्षाचा आयटीआय प्रमाणपत्र.

  • उच्च विभाग लिपिक (UDC) : न्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 50 टक्के गुणांसह पदवी. प्रतिमिनिट किमान 30 शब्दांच्या वेगाने इंग्रजीमध्ये टाईपिंग करणे.

  • ड्रायव्हर (साधारण ग्रेड) : मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण. तसेच, LMV ड्रायव्हिंग लायसन्स आणि तीन वर्षांचा अनुभव.

  • सुरक्षा रक्षक : मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास.

loading image
go to top