B Pharm Admission : ‘बी.फार्म’च्या थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशाची नोंदणी सुरू; नोंदणीसाठी १८ जुलैपर्यंत अंतिम मुदत

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) औषधनिर्माणशास्त्राच्या पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या (बी. फार्म) केंद्रीय प्रवेशाच्या नोंदणीस सुरुवात झाली आहे.
b pharm admission

b pharm admission

sakal

Updated on

पुणे - महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) औषधनिर्माणशास्त्राच्या पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या (बी. फार्म) केंद्रीय प्रवेशाच्या नोंदणीस सुरुवात झाली आहे. अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीसाठी १८ जुलैपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेद्वारे (पीसीआय) मान्यताप्राप्त संस्थेतून ‘डी. फार्म’ अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेले आणि या अभ्यासक्रमाची पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com