dotted drawing
sakal
- मृदुला अडावदकर, सर्जनशील व आंतरविद्याशाखीय शिक्षणतज्ज्ञ
खालील दिलेल्या ठिपक्यांच्या आकृतीचं निरीक्षण करा. काय दिसतंय? अगदी वस्तुनिष्ठपणे बोलायचं म्हटलं तर तीन ठिपके किंवा तीन बिंदू किंवा चार ठिपके म्हणजे चार बिंदू. तरीही आपल्या मनात मात्र त्रिकोण आणि चौकोन हे आकार डोकावून गेलेच ना? हे असं कसं झालं? तर आपल्या मेंदूने त्या दोन बिंदू मधली जागा भरून काढली आणि त्यामुळे आपल्या मनात त्रिकोण आणि चौकोन या आकारांचं चित्र तयार झालं.